कोविड लसीकरणाचे आयोजन

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 19/01/2021 7:26 AM

कल्याण : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार  कल्याण पश्चिम येथील रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पूर्व येथील शक्तीधाम विलगीकरण केंद्र आणि डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रुग्णालय येथे प्रत्येकी 100 म्हणजे एकूण 300 लाभार्थ्यांचे, कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पहिली लस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी घेतली,  डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पहिली लस तेथील डॉ. संतोष केंभवी यांनी घेतली, आणि शक्तीधाम विलगीकरण केंद्रात पहिली लस डॉ. संदीप निंबाळकर यांनी घेतली, आज लस घेतलेल्या तीनशे लाभार्थ्यांमध्ये कल्याण  डोंबिवली महापालिकेचे डॉक्टर्स, I.M.A चे कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकारी तसेच खाजगी डॉक्टर यांचा अंतर्भाव होता .आज दुपारी 3.30 वाजेपर्यंत एकूण 300 लाभार्थ्यांचे  लसीकरणाचे उद्दीष्ट यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. लसीकरणानंतर प्रत्येक लाभार्थ्यास अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवले होते.  लस घेतलेल्या कुठल्याही लाभार्थ्याला काही त्रास जाणवलेला नाही.

 लसीकरणाचे वेळी कल्याण मध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयात ,पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  व महापालिकेचे डॉ.विनोद दौंड, शास्त्रीनगर रुग्णालयात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील आणि शक्तीधाम विलगीकरण केंद्रात महापालिका उपायुक्त सुधाकर जगताप आणि डॉ.समीर सरवणकर समक्ष उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या