वाघमोडेनगर विस्तारित भागात पिण्याच्या पाईपलाईन कामास मंजुरी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/01/2021 6:48 PM


    
    नगरसेवक गजानन मगदुम  यांच्या प्रयत्नातुन कुपवाड वार्ड क्रमांक २ मधील वाघमोडेनगर भागात विस्तारीकरणामुळे पुर्वी टाकणेत आलेल्या पाईप लाईन या अपुर्‍या पडत आहेत ,यासाठी काही दिवसापुर्वी मुख्य  ८ "पाइप लाईन कुपवाड पाण्याची टाकी ते दत्ता पाटोळे यांच्या घरापर्यंत पाईप टाकुन मायाक्का मंदीर या भागातील पाणी प्रश्न सोडवण्यात आला होता. त्याचप्रमाणे वाघमोडेनगर भागातील अंतर्गत गल्ली मधील पाईप लाईन टाकणेबाबत दि.२०.०६. २०१९ पासुन पाईप लाईनचे काम  प्रस्तावित केले होते. आयुक्तांना सदर भागातील पाहणी करुन सदर कामाची आवश्यकता पाणी पुरवठा अधिकार्‍यांसमवेत दाखवणेत आली होती, त्यास आयु्कतांनी यांनी मान्यता देणेत आली होती. वाघमोडेनगर  विस्तारित  भागातील पाईप लाईन टाकणेस सुरवात होणार आहे. काही ठिकाणी रस्तेची कामगिरी मंजुर असल्यामुळे तातडीने सदरच्या पाईप लाइन टाकणेचे काम आज सुरु करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या