लोकभावनांचा विचार करुनच भुखंडाबाबत निर्णय , आयूक्त यांचे सर्वपक्षीय कृती समितीला आश्वासन..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/01/2021 5:47 PM




आज सर्वपक्षीय कृती समितीने मनपा आयुक्त कापडणीससाहेब यांचेशी बैठक केली.
     सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने विश्रामबाग सांगली येथील स.नं. ३६३/२ मधील ६६०० चौ. मी. जागेवरील आरक्षित भूखंडावरील आरक्षण उठविण्याची जी प्रक्रिया चाललेली आहे,  त्याबाबतीत आलेल्या हरकतींची सुनावणी घेण्यात यावी व वस्तुनिष्ठ अहवाल महासभेसमोर ठेवून शासनाला अहवाल पाठविण्यात यावा;  अशी विनंती करण्यात आली.
      मा. आयुक्तांनी आज झालेल्या बैठकीमध्ये सदर आरक्षित भूखंडाबाबतीत गेल्या दीड-दोन महिन्यांपासून प्रसार माध्यमातून प्रशासन दोषी आहे;  अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे प्रशासनाला खेद वाटत आहे. मात्र प्रशासनाला काम करताना लोकभावनेचा व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो. त्यानुसार सदर आरक्षित भूखंडाच्या बाबतीत आलेल्या सूचना व हरकतींवर जनसुनावणी घेण्यात येईल व सर्व वस्तुनिष्ठ अहवाल तसेच लोकभावनेचा आदर करून महासभेसमोर हा अहवाल सादर करण्यात येईल,  असे सर्वपक्षीय कृती समितीला आश्वस्त केले. 
      मा. आयुक्तांच्या वरील भूमिकेचे सर्वपक्षीय कृती समितीने स्वागत केले आहे. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे माजी आमदार शरद पाटीलसर,  माजी आमदार नितीनराजे शिंदे, मा. पृथ्वीराज पवार, मा हणमंतराव पवार,मा. शंकर पुजारी , मा. सतीश साखळकर, मा. अशरफ वांकर, मा. शंभूराजे काटकर , मा. विजय नामजोशी , मा. विनायक वझे, मा. भास्कर कुलकर्णी, मा. नितीन काळे हे उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या