कोरोनानिधीसाठी तैलचित्र काढत आहेत आदमअली मुजावर..., स्वःताच्या घरीच लावले तैलचित्रांचे प्रदर्शन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/11/2020 8:14 PM


       ## कोरोना निधी साठी केलेल्या छत्रपती शिवाजी राजे यांच्या पेंटिंगची पन्नास हजार रुपयाला विक्री..
      


                   अजितराव घोरपडे विद्यालयाचे कलाशिक्षक. जगप्रसिद्ध रांगोळीकार चित्रकार. आदमअली मुजावर यांनी. केलेल्या तैल  चित्रांचे प्रदर्शन त्यांनी घरी सुरू केले आहे. लॉक डाऊन चा उपयोग सत्कारई  लागावा म्हणून त्यांनी पेंटिंग करण्यास सुरुवात केली. महामानवांची अनेक पेंटिंग त्यांनी केली आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी राजे,  छत्रपती संभाजी राजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बसवेश्वर, अहिल्याबाई होळकर, गौतम बुद्ध, असे व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. त्या पेंटिंग चे प्रदर्शन त्यांनी घरीच सुरू केले आहे. होणाऱ्या पेंटिंगच्या विक्रीतून खर्च वजा जाता राहिलेली सर्व रक्कम. (कोरोना) मुख्यमंत्री सहायता निधी साठी देण्याचा मानस आहे. हे पेंटिंग करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. ही सर्व पेंटिंग ऑइल कलर व कॅनव्हासवर रेखाटन केलेले आहेत. ही पेंटिंग दीर्घायुष्य टिकणारी आहेत. शंभर ते दीडशे वर्ष हे पेंटिंग आबाधित राहतील. या पेंटिंगच्या किमतीही मार्केट रेट प्रमाणे नसून. कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत. त्या पेंटिंग साठी आलेला खर्च. व आपण द्यायल ते  स्वागत मूल्य अशा कमी किमतीत ते पेंटिंग उपलब्ध आहेत. छोट्या पेंटिंग साठी पाच ते दहा दिवस व मोठे पेंटिंग साठी पंधरा ते वीस दिवस अशी मेहनत घेऊन ते पेंटिंग पूर्ण केले आहेत. कोरोना च्या महाभयंकर संकटामध्ये या देशाचा व महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझेही काही कर्तव्य आहे. हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. परमेश्वराने दिलेली ही कला  मनाला तर खूप आनंद देतेच पण त्या कलेतून समाज कार्य ही करू शकतो. अशी त्यांची भावना आहे. लॉक डाऊन चा मिळालेला वेळ मी चांगल्या कामासाठी खर्च केलं याचा मला आनंद आहे हे ते आनंदाने सांगतात. सहा महिन्यातील पूर्ण दिवस पेंटिंग केलो आहे. एकही दिवस वाया गेलेला नाही. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जास्तीत जास्त निधी देण्याची इच्छा आहे. त्यातील काही पेंटिंग स्वागत मूल्य देऊन त्यांच्या मित्रांनी खरेदी केली आहेत. सी.आर. सांगलीकर फाउंडेशन चे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती. सी.आर सांगलीकर साहेब यांनी छत्रपती शिवाजीराजे यांचे  पेंटिंग 50 हजार रुपये स्वागत मूल्य देऊन विकत घेतले व सामाजिक बांधिलकी जोपासली. त्याच बरोबर. आरग गावचे. अमर पाटील.  पेटवडगाव चे शिक्षक प्रदीप येवले, कळंबी चे ग्रामसेवक संदीप साळुंखे. शिक्षिका स्मिता माळी, उपशिक्षणाधिकारी मारुती लिगडे, सिद्धेवाडी चे विद्यमान सरपंच. दादा वाघमोडे. मिरजेचे प्रसिद्ध डॉक्टर. परमशेट्टी. या व्यक्तीने त्यांची पेंटिंग स्वागत मूल्य देऊन विकत घेतले आहे. जिल्ह्यातील अनेक व्यक्तीने. त्यांच्या पेंटिंग प्रदर्शनाला भेट देऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे... माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार. शिक्षण प्रसारक मंडळ कळंबी चेअरमन. डी. एन. पाटील. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी. सुधाकर तेलंग साहेब. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती. दिनकर पाटील उपशिक्षणाधिकारी. महेश धोत्रे. शिक्षणाधिकारी. महेश चोथे. विस्ताराधिकारी प्रदीप चव्हाण. कोल्हापूरचे वित्त अधिकारी राहुल कदम, ॲडिशनल कलेक्टर. श्री अशोक पाटील. सांगली जिल्ह्यातील परिसरातील अनेक कलाप्रेमी नी प्रत्यक्ष भेट देऊन  शुभेच्छा दिले आहे. त्याच बरोबर मंत्रालयातील अवर सचिव. प्रल्हाद रोडे. डी.वाय.एस.पी कृष्णात पिंगळे, सेल टॅक्स कमिशनर मुंबई महेश पाटील, एडिशनल एस.पी सांगली. मनीषा दुबुले, एडिशनल एस.पी ठाणे संजय पाटील या सर्वांनी ऑनलाइन पेंटिंग पाहून फोनवर शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या