शेतकर्यांचा भव्य मोर्चा धडकला विजमहावितरण कार्यालयावर ( कृषी पंपाची लोडशेडीगं बंद करण्याची मागणी)

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 23/11/2020 5:59 PM

कूरखेडा :-

       कृषी पंपाचा फीडर वर सूरू करण्यात आलेली १६ तासाची लोडशेडीगं बंद करण्यात यावी या मागणी करीता आज दू १२ वाजता माजी जि प सदस्य सूरेंन्द्रसिंह चंदेल यांचा नेतृत्वात शेकडो शेतकर्यांचा भव्य मोर्चा येथील विजमहावितरणचा उपविभागीय अभीयंता कार्यालयावर धडकला यावेळी आंदोलकानी रौद्ररूप धारण करीत कंपनी चा धोरणाविरोधात मोठी घोषणाबाजी करीत कार्यालयाचा दारावरच ठीय्या आंदोलन सूरू केले

         गेवर्धा येथील महावितरणचा सबस्टेशन मधून १० ते १२ गावातील कृषी पंपाना विजेचा पूरवठा करण्यात येतो मात्र मागील काही दिवसापासून यालाईन वर १६ तासाची लोड शेडिंग करण्यात येत असल्याने परिसरातील शेतकर्याना रब्बी हंगामातील धान पीक घेणे अशक्य झाले आहे त्यामूळे महावितरणचा या धोरणामूळे शेतकरी वर्गात मोठा असंतोष पसरलेला आहे याबाबद यापूर्वी सूद्धा अनेकदा निवेदन घेराव आंदोलन करण्यात येऊनही आश्वासना शिवाय काहीच हाती लागले नाही त्यामूळे आज संतप्त शेतकर्यानी आज चंदेल यांचा जनसंपर्क कार्यालय पासून मोठी घोषणाबाजी करीत मोर्चा काढला हा मोर्चा विज कार्यालयावर धडकला कार्यालयाचा दारावरच पोलीसानी मोर्चेकरूना थोपवून धरले त्यामूळे दारावरच ठीय्या आंदोलन सूरू करण्यात आले उपविभागीय अभीयंता मूरकूटे यानी संतप्त मोर्चेकरूशी संवाद साधला मात्र निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा मोर्चेकरूनी घेतल्याने पेच वृत्त लिहेपर्यंत ठिय्या आंदोलन सूरूच होते यावेळी मोर्चेकरूचे रौद्ररूप बघत ठाणेदार सूधाकर देडे व साहायक पोलीस निरीक्षक समीर केदार यांचा नेतृत्वात सशस्त्र पोलीसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता मोर्चात माजी नगराध्यक्ष डॉ महेन्द्र कुमार मोहबंसी माजी शिवसेना ता प्रमूख आशीष काळे, शेतकरी नेते घिसू पाटील खूणे, नगरसेवक पूंडलिक देशमुख,सोनू भट्टड,विजय पूस्तोडे,उल्हास खूणे,दशरथ लाडे, राकेश खूणे,देवा खूणे,दिगांबर नाकाडे,गूणवंत कवाडकर,बंडू खूणे,मनोहर लांजेवार,जगेंन्द्र बूद्धे,जानबा डोकरमारे, पूरषोत्तम तिरगम,प्रकाश दरवडे,अशोक गायकवाड़,अरूण नैताम,भोजराज खूणे व शेकडो शेतकरी सहभागी होते.












नितीन देविकार (गडचिरोली जिल्हा उपसंपादक)
9404231937

Share

Other News

ताज्या बातम्या