भाजप मिरजच्या वतीने वीजबिल फाडो आंदोलन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/11/2020 1:11 PM

            

         भारतीय जनता पार्टी मिरज चे वतीने महाराणा प्रताप चौक येथे आघाडी सरकार चे विरोधात आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

महाराष्ट्र राज्यात मविआ सरकारने वाढीव वीजबिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत. या नाकर्त्या सरकारच्या विरोधात वीज बिल फाडून व शासनाच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन केले. सत्तेत आल्यावर 100 दिवसात 100 युनिट पर्यंत मोफत वीज देतो म्हणून फसवी घोषणा केली, लॉक डाऊन काळातील वाढीव वीजबिल माफ करतो असे जाहीर केले पण आज बिल भरण्याचा जाचक आदेश काढला यासाठी तिघडी सरकारचा धिक्कार असो अश्या घोषणा देऊन झोपलेल्या सरकारला जाग येईल व ते त्यांचा निर्णय बदलावा लागेल अश्या प्रकारे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे, प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जाती मोहन व्हणखंडे सर, उपमहापौर आनंद देवमाने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, माजी महापौर संगीता ताई खोत, नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, गणेश माळी, दिगंबर जाधव, संदीप सलगर, परसु बापू नागरगोजे, सुमेध ठाणेदार, महादेव कुरणे, विठ्ठल तात्या खोत, ओंकार शुक्ला, जयगोंड कोरे, महेश फोंडे ,डॉक्टर पंकज म्हेत्रे, रोहित चिवटे, आश्विन कोरे, अनिल  हारगे, अण्णा रसाळ, उमेश हारगे, राज कबाडे, संदीप कबाडे, राजा देसाई, अभिरूप कांबळे, महेश मुळे, शिवाजी चोकाके, हृषिकेश कुलकर्णी, महिला जिल्हा सरचिटणीस वैशाली पाटील, अनिता हारगे, रुपाली देसाई, माधुरी कापसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनाचे संयोजन भाजपा मिरज शहर पश्चीम मंडळ अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर व पूर्व मंडळ अध्यक्ष राजेंद्र नातू यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या