हरवलेल्या बालिकेला नगरसेवक अभिजीत भोसले यांनी सुखरूप घरी पोहोचवले

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/11/2020 11:23 AM

#काल_सापडलेल्या_मुलीला_तिच्या_घरी_सुपूर्द_केले
#धन्यवाद 

  खालील फोटो मध्ये असलेली कन्या माझ्या प्रभागात रडत फिरत असलेली आढळून आलेली होती.ती रडत असलेली पाहून तिला  माझ्या मित्र परिवारापैकी एक Mahesh Sonar आणि माझे बंधू सोमनाथ भोसले यांनी तिची विचारपूस केली. तिला माझ्या घरी घेऊन आले.सगळ्याच मित्र परिवाराने आसपास फिरती करून चौकशी केली, पोलिसांना माहिती दिली. 
       त्या मुलीच्या कुटुंबा बाबतीत योग्य ती खात्री होईपर्यंत आणि तिचे आई-वडील मिळून त्यांच्याकडे ती सुखरूप पोचेपर्यंत शिवाय पोलिस खात्याकडून पुढील सूचना मिळून काम करेपर्यंत तिची संपूर्ण व्यवस्था तिची योग्य ती काळजी आम्ही कुटुंबीय आणि मित्र परिवाराने मिळून घेतली.
   आज सकाळीच यल्लव्वा रामा जाधव,रेणुका राकेश शिंदे 
,दीपा व्हसकोटी 
सर्व राहणार वडार कॉलनी असून यांनी संपर्क केला. त्यानुसार त्या भागातील 
नगरसेवक प्रकाश मुळके Prakash Mulake यांना संपर्क करून खात्री करून मुलगी ताब्यात दिली. तिला तिच्या कुटुंबातील लोकांकडे योग्य ठिकाणी दिल्याचे समाधान मिळाले.महेश सोनार श्रावण माळी अनिरुद्ध  बनगे बालाजी कोळेकर प्रवीण हाणमाने आदी मित्रानी ह्यात सहकार्य केले. धन्यवाद आज एका मुलीला तिच्या घरी योग्य ठिकाणी सुपूर्द केल्याचं समाधान मला,कुटुंबातील सर्वांनाच आणि मित्रपरिवाराला आहे.धन्यवाद 
-आपला अभिजित भोसले नगरसेवक सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

Share

Other News

ताज्या बातम्या