कोरची चीचगड मार्गाचा तो झाड धोकादायक!

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 22/11/2020 5:31 PM

कोरची :-

             कोरची मुख्यालयापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर पकनाभट्टी या गावाजवळ साधारण सहा महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यावर झाड कोसळून पडले होते व या झाडामुळे काही वेळापुरती वाहतूक सेवा पण ठप्प झालेली होती. गावकऱ्यांनी श्रमदानातून हे कोसळलेले झाड कापून गाडी निघण्यापुरती बाजूला सरकवले होते. परंतु अजूनही अर्ध्या रस्त्यावर झाड पडलेल्या अवस्थेत असून हे झाड अपघाताला आमंत्रण देत असल्याचे जाणवत आहे. कोरची चीचगड मार्ग हा राष्ट्रीय मार्ग असून या मार्गाने नेहमी जड वाहनांची ये-जा सुरू असते. रात्रीच्या वेळेस दुचाकीस्वारांना हे झाड मोठ्या गाड्यांच्या लाईटमुळे दिसत नसून कधीही या झाडा मुळे मोठे अपघात होऊन जीवित हानी सुद्धा होऊ शकते. संबंधित विभागाकडून हे झाड त्वरित हटविण्यात यावे जेणेकरून कुठलाही मोठा अपघात होता कामा नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









जितेंद्र सहारे (कोरची तालुका प्रतिनिधी)
9423373622

Share

Other News

ताज्या बातम्या