मनसे नेते बाळा नांदगावकर आणि आमदार राजू पाटील यांनी घेतली अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची भेट....

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 01/11/2020 12:08 AM

मनसे नेते बाळा नांदगावकर आणि आमदार राजू पाटील यांनी घेतली अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची भेट....


कल्याण/अंबरनाथ : कल्याण मध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची भेट घेतली.यावेळी मनसेचे अंबरनाथ उपशहर प्रमुख राकेश पाटील याच्या हत्या करण्याला मुख्य आरोपीला त्वरित पकडून मोक्का लावायची मागणी केली. तसेच मनसे उल्हासनगर मधील कार्यकर्ते मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणारे आरोपी त्वरित पकडा अशी मागणी केली. 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अंबरनाथ गावातील राकेश पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ही फोनवरून पाटील कुटुंबीयांची संवाद साधत त्यांना धीर दिला. राकेश पाटील यांच्या हत्येमागे नेमकं काय कारण होतं, हे शोधून काढण्यासोबतच आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या वेळी बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. मुख्य आरोपी डी मोहन याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून फक्त याच हत्येच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नव्हे, तर त्याचा पूर्वइतिहास पाहता त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नांदगावकर यांनी केली. 

Share

Other News

ताज्या बातम्या