गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मागणी
राज्याचे महसूल मंत्री बाळा थोरात यांना प्रत्यक्ष भेट घेऊन केले निवेदन सादर
गडचिरोली, दि. ३१ आक्टोम्बर २०२० :-
गडचिरोली जिल्ह्यातील रेती घाटांचे तात्काळ लिलाव करण्यात यावेत, अशी मागणी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केले व विस्तृत चर्चा केली.
ब्राम्हणवाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव अजूनही झाले नाही. त्यामुळे विविध बांधकाम करण्यासाठी रेतीची कमतरता भासत आहे. यामध्ये प्रामुख्याने गरीब नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांना बाहेर ठिकाणाहून रेती आणावी लागत आहे. यात नागरिकांना आर्थिक अधिक भुर्दंड बसत आहे. शिवाय विविध बांधकाम ठप्प पडले आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यात अगोदरच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पुन्हा ही रेतीची नवीन समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी महसूलमंत्री थोरात यांच्याकडे केली आहे. याबाबत चर्चा करताना महसूलमंत्री थोरात यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे ब्राम्हणवाडे यांनी स्पष्ट केले आहे.
राजेश नाथानी (गडचिरोली तालुका प्रतिनिधी)
9422355550