सरकारचे अभिनंदन करू, ढोल वाजवू : बाळा नांदगावकर.

  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 31/10/2020 7:11 PM

कल्याण – लोकांना जे आवश्यक आहे ते करा. रेल्वे आणि मंदिर लवकरात लवकर उघडा, आम्हीही सरकारचे अभिनंदन करू, ढोल वाजवू असे विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. जीएसटीची केंद्र सरकारकडून किती रक्कम येणार आहे. आम्हीही संभ्रमामध्ये आहोत कारण फायनान्स मिनिस्टर एक आकडा सांगतात. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री वेगवेगळे आकडे सांगत आहेत. त्यांनी एकत्र येऊन ठरवले पाहिजे. किती पैसे येणार आहेत असा टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला लावला आहे.

शुक्रवारी मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे आमदार राजू पाटील, माजी आमदार प्रकाश भोईर, प्रदेश सचिव इरफान शेख यांनी कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांची भेट घेतली. मनसे पदाधिकारी राकेश पाटील हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधारला लवकरात लवकर अटक करावी तसेच  उल्हासनगर मधील मनसे पदाधिकारी मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना  अटक करण्याची मागणी मनसे नेत्यांनी पोलिसांकडे केली आहे.

यावेळी बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, सर्व ठिकाणी मंदिर उघडली आहेत, रेल्वे सुरू केली पाहिजे आणि मंदिरे लवकरात लवकर खुली केली पाहिजेत लोकांना जे आवश्यक आहे. ते केले पाहिजे लोकांच्या भावनांचा सन्मान राखणे हे सरकारचे काम असून सरकारने ते केले पाहिजे. श्रेय तुम्ही घ्या, आम्ही तुमचे  अभिनंदन करू,  ढोल वाजवू. जीएसटी संदर्भात केंद्र सरकारकडून किती रक्कम येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री सांगतात ३८ हजार कोटी येणार आहेत, बाळासाहेब थोरात सांगतात ३० हजार कोटी येणार आहेत. उपमुख्यमंत्री सांगतात ६० हजार कोटी येणार आहेत. आम्ही संभ्रमामध्ये आहोत की नक्की किती जीएसटी केंद सरकारकडून येणार आहे . त्यांनी एकत्र बसून ठरवले पाहिजे कि अखेर किती रक्कम आहे आणि केंद सरकारने सुद्धा राज्य सरकारला मदत केली पाहिजे असा टोला बाळा नांदगावकर यांनी सरकारला लगावला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या