ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

...तर पाली-भूतीवली धरणाच्या पाण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरेल


  • M.Samir Mahadkar (Mhasla )
  • Upadted: 10/28/2020 10:20:52 PM

◾ मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा इशारा 

◾कर्जत तालुक्यात मनसेचा झंझावात 

आषाणे परिसरात रस्ते, पाणी, यासह रोजगाराची समस्या मोठी आहे. गावाच्या उशाला पाली- भूतीवली धरण आहे. या धरणातील पाण्यासाठी अनेकदा संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र, अद्यापही पाणी समस्या सुटलेली नाही. आता ही समस्या सुटली नाही तर मनसे रस्त्यावर उतरले, असा इशारा मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.   आषाणे येथे नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मनसे तालुकाध्यक्ष अंकुश शेळके, उपतालुकाध्यक्ष प्रविण बोराडे, यशवंत भवारे, अकबर देशमुख, दिनेश बोराडे, तालुका सचिव प्रदीप पाटील, कर्जत शहराध्यक्ष समीर चव्हाण, नेरळ शहराध्यक्ष मिलिंद मिसाळ, दहिवली पंचायत समिती विभाग अध्यक्ष मंगेश गोमारे, उमरोली पंचायत समिती विभागप्रमुख तेजस तुपे, उमरोली पंचायत समिती उपविभाग अध्यक्ष मनोज ठाणगे आदी मान्यवर उपस्थित होते.   जितेंद्र पाटील पुढे म्हणाले, मनसे हा तरुणांना पुढे नेणारा पक्ष आहे. केवळ शाखा उघडणार नाही, तर नागरी समस्यांसाठी संघर्ष करू, असे सांगतानाच पाटील यांनी मनसेतर्फे आषाणे गावाला बोअरवेल मारून देण्याचे आश्वासन दिले.   तालुकाध्यक्ष अंकुश शेळके म्हणाले की, तालुक्यात मागील 30 वर्षात शिवसेनेचे 3 वेळा आमदार, राष्ट्रवादीचे 3 वेळा आमदार झाले. आता पुन्हा शिवसेनेचाच आमदार आहे. मात्र, आषाणे गावातील पाणीसमस्या सुटलेली नाही. गावाच्या उशाशी साडेबाराशे हेक्टरचे पाली-भूतीवली धरण आहे. हे पाणी परप्रांतीय बिल्डरांना दिले जाते. मात्र, स्थानिकांच्या जमिनी घेऊन त्यांना काहीच दिले नाही.   वनसंरक्षक समितीकडून भ्रष्टाचार   आषाणे गावाजवळील धबधब्यावर स्थानिकांना 2 महिने रोजगार मिळतो. वनविभागाची त्यावर नजर आहे. वन संरक्षक समितीच्या माध्यमातून या ठिकाणी पावती फाडली जाते. याचा ग्रामपंचायतीकडे उल्लेख नाही. कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. मग हा पैसा जातो कुठे? हा मोठा भ्रष्टाचार आहे, असा आरोप अंकुश शेळके यांनी केला.   पदाधिकाऱ्यांची नियुक्ती   दरम्यान, शाखा अध्यक्ष आशिष ठाणगे, उपाध्यक्ष रोशन जाधव, सचिव कृष्णा श्रीखंडे, खजिनदार प्रशांत ठाणगे आदी पदाधिकारी निवड करण्यात आली असून तुषार ठाणगे, राजेश ठाणगे, अजित श्रीखंडे, राहुल ठाणगे, अशोक कर्णूक, राकेश ठाणगे, सोमनाथ ठाणगे, अविनाश ठाणगे, नितीन ठाणगे, रतन ठाणगे, प्रफुल्ल ठाणगे, रोशन श्रीखंडे, विशाल श्रीखंडे यांच्याकडे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Share

Other News