ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील कासार शिरशी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी देव म्हणून पावले..!


  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 10/18/2020 12:03:32 AM

निलंगा;प्रतिनिधी- महादेव कळसे
 मो.90 21 53 51 95
लातूर;- निलंगा तालुक्यातील कासार शिरशी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक एम एम धुमाळ यानी सतत चार दिवस झालेल्या पावसामुळे रोड लगतच असलेल्या वडे, नंदया, तळे मोठ्या तुडम्ब प्रमाणात भरून जात असल्यामुळे या वाहत्या पाण्यात दोन व्यक्ती वदयामध्ये वाहून जात होते त्यावेळी कासार शिरशी पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले  एम एम धुमाळ यांनी प्रसंगवधान राखून वेळीच आपला जीव मुठीत ठेवून कर्तव्यदक्षरित्या दोघांचे जीव वाचवले. 
अश्या कर्तव्यदक्ष कार्यामुळेच निलंगा तालुक्यामध्ये पोलीस जनतेला देवा सारखेच वाटत आहेत. म्हणून निलंगा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून सन्मानपूर्वक पोलिस एम एम धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला निलंगा येथील शिवाजी चौकात ह्या कर्तव्यदक्ष ख़ाकीतील देव एम एम धुमाळ साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी अशोक पांडुरंग ढोणे यांनी पुष्पहार,मानाचा फेटा, शाल, श्रीफळसह त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित इतर कर्मचारी मारुती मानवर, दीपक थेटे , कुदरत शेख व निलंगा नगरीतील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. या सत्कार समारंभ प्रसंगी विनोद आये शिवसेना उपजिल्हा प्रमुख लातूर दाजीबा कांबळे, ऍडवोकेट बडापा कोकणे, सुमित नीला, विशाल कांबळे, सहदेव मसलगे ,विक्रांत आये,अभिजीत सूर्यवंशी आरिफ शेख व मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते,स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Share

Other News