ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पंचायत समिती कोरची येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जागतिक हात धुवा दिवस साजरा


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 10/17/2020 3:35:51 PM
कोरची - आशिष अग्रवाल


                     भारत सरकार द्वारे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंसचायत समिती कोरची येथे जागतिक हात धुवा दिन 15 ऑक्टोंबर ला साजरा करण्यात आला. सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातलेला असून कोरोनापासून बचावाकरिता हात नियमितपणे स्वच्छ धुने सुद्धा गरजेचे आहे. शरीराचे कित्येक आजार हे सुद्धा नियमित होत नसल्यामुळे निर्माण होता म्हणून आपल्या शरीराची निगा राखण्यासाठी नियमित हात धुवावे असे प्रतिपादन पंचायत समिती कोरचीचे गट विकास अधिकारी डी.एम.देवरे यांनी केले. तसेच गुटेकसा, कुमकोट, काळे, पांढरीगोटा, सातपुती येथे शिवार फेरी काढण्यात आली व या पाचही गावात हात धुवा मोहीम राबवून कामाचे नियोजन सुद्धा करण्यात आले. 
                        कुपोषित बालकांना जी आर डी बिस्किट व दोन महिन्यापर्यंत अंडे देण्याचे निर्देश संबंधित ग्रामसेवक यांना देण्यात आले व दोन महिन्यात सैम व मैम कुपोषित बालकांना नॉर्मल मध्ये आनण्याची सूचना सुद्धा देवरे यांनी दिली. यावेळी गटविकास अधिकारी डी.एम.देवरे, पं. स. सदस्य सदाराम नुरुटी, सरपंच बुधराम फुलकुवर ग्रा.पं. सातपुती,  उपसरपंच विलास होळी ग्रा.पं.सातपुती, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका भोयर, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, मिसार ग्रामसेवक, वंजारी ग्रामसेवक, लाकडे ग्रामसेवक, काशीवार ग्रामसेवक तसेच पंचायत समिती कोरची येथील कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News