भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्रोत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त देसाईगंज तालुक्यातील मौजा पोटगाव येथे सेवा सप्ताह व वृक्षारोपण कार्यक्म संपन्न

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 25/09/2020 6:20 PM

देसाईगंज:-दिनांक २५ सप्टेंबर २०२०

देशाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांची आज  गरज - आ.कृष्णा गजबे

    तत्वचींतक,महान समाजसुधारक भारतीय जनसंघाचे संस्थापक, भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्त्रोत पंडित दीनदयाल उपाध्याय  यांच्या विचारांची आज देशाला गरज असून त्यांचे विचार प्रत्येकाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ.कृष्णा गजबे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मौजा पोटगाव येथील आयोजित कार्यक्रमात केले .यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून  किसन नागदेवे भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्यासह मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष न.प. देसाईगंज,शालू  दंडवते नगराध्यक्षा नगर परिषद देसाईगंज, रमाकांत ठेंगरी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली, सदानंद कुथे भाजपा जिल्हा महामंत्री, विलास गावंडे भाजपा, राजेश जेठानी भाजपा तालुका अध्यक्ष देसाईगंज,सौ. रोशनी पारधी महिला व बालकल्याण विकास सभापती जिल्हा परिषद गडचिरोली,सौ. रेवता अलोने पंचायत समिती सभापती देसाईगंज, शेवंता अवसरे उपसभापती पंचायत देसाईगंज,सौ.अर्चना ढोरे पंचायत समिती सदस्य देसाईगंज प्रिती शंभरकर माजी उपसभापती पंचायत समिती देसाईगंज, सुनील पारधी योगेश नागतोडे माजी सरपंच ग्रा.प. आमगाव, श्याम अलोने,कांबळे,चंद्रकांत रणदिवे भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख पोटगाव,चांगदेवजी हरडे,महिंद्र सोनपिपरे, साईनाथ मेश्राम तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख्याने उपस्थित होते. 







फिरोज लालानी (वडसा तालुका प्रतिनिधी) 

94217 28186

Share

Other News

ताज्या बातम्या