देशाला पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या विचारांची आज गरज - आ. डॉ.देवराव होळी

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 25/09/2020 6:03 PM

भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्रोत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त  विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथवर कार्यक्रम

मेक इन गडचिरोलीच्या वतीने सुद्धा आत्मनिर्भर भारत संवाद अभियान सप्ताह राबविणार

गडचिरोली:- 

तत्वचींतक,महान समाजसुधारक भारतीय जनसंघाचे संस्थापक, भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्त्रोत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांची आज देशाला गरज असून त्यांचे विचार प्रत्येकाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ.डॉ.देवराव होळी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले. यानिमित्त विधानसभेतील प्रत्येक बुथवर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार व प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर पक्षाचा ध्वज लावण्यात येणार  असल्याची माहिती आमदार महोदयांनी दिली.

दिनांक 25 सप्टेंबर पंडित दीनदयालजी उपाध्याय यांची जयंती व दिनांक 2 ऑक्टोंबर महात्माजी गांधी यांची जयंती या निमित्त दिनांक 25 सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर यादरम्यान आत्मनिर्भर भारत संवाद अभियान सप्ताह संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात राबविण्यात येणार असून या सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. आज गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथावर पंडितजींना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या घरावर पक्षाचा ध्वज फडकविण्यात येणार आहे या सप्ताहामध्ये  मेक इन गडचिरोलीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आ. डॉ.देवराव होळी यांनी दिली कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा ,प्रमोद पिपरे , नगराध्यक्षा योगिता पिपरे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे न प उपाध्यक्ष अनिल गारकर प्रदेश कार्यकारिणीची किसान आघाडीचे सदस्य रमेश भुरसे, शहर महामंत्री विनोद देवोजवार , राजू शेरकी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख्याने उपस्थित होते








निखील राखडे (गडचिरोली जिल्हा मुख्य प्रतिनिधी )
7774807014

Share

Other News

ताज्या बातम्या