खा.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती कार्यक्रम

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 25/09/2020 5:58 PM

गडचिरोली :- दि. 25 सप्टेंबर 
         
         भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष, अंतोदयचे प्रणेते, एकात्म मानवता वादाचे प्रणेते परमपूज्य पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. तसेच पंडित दीनदयाल जी अमर रहे.. अमर रहे... अशा घोषणा देत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्य व विचारांवर प्रकाश टाकला.

     यावेळी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, अनु.जाती मोर्चा चे महामंत्री जनार्धन साखरे, व्यापारी आघाडी चे श्रीकांत पतरंगे, अल्पसंख्यांक सेलचे  महामंत्री जावेद अली सय्यद, राकेश राचमलवार, राजूभाऊ शेरकी, स्वीयसहाय्यक रविंद्र भांडेकर, प्रल्हाद बडवाईक तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.









निखील राखडे (गडचिरोली जिल्हा मुख्य प्रतिनिधी)
7774807014

Share

Other News

ताज्या बातम्या