ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पाडळी शिंदे ,मेंडगाव ,येथे जनावरांना लसीकरण ! ८००जनावरांना लसीकरण


  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 9/25/2020 2:41:04 PM

पाडळी शिंदे(प्रतिनिधी):-देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा  येथिल पशु वैद्यकीय श्रेणी १ दवाखान्या अंतर्गत येणाऱ्या पाडळी शिंदे व मेंडगाव येथे २५सप्टेंबर रोज शुक्रवारी जनावरांना गावात जाऊन लम्पि आजारासाठी प्रतिबंध करणारी लस देण्यात आली. सदर लसीकरण करावे यासाठी शिवसेना विभाग प्रमुख पत्रकार स्वप्नील शिंदे यांनी जिल्हा पशुसंवर्धन आधिकारी के.एम.ठाकरे यांच्या कडे वेळोवेळी पाठपुरावा करून जनावरांना लम्पि आजाराने ग्रासले असून त्यावर तात्काळ लस उपलब्ध करून शेतकरी वर्गांना आधार द्यावा. ही  मागणी केली होती त्यांनी तातडीने या मागणीची दखल घेऊन तात्काळ जिल्हाभरात पशुसंवर्धन आधिकारी के.एम.ठाकरे यांनी लस उपलब्ध करून दिली व तिचा शुभारंभ पाडळी शिंदे येथे करून शेतकरी विशाल वसंतराव शिंदे यांच्या बैलांना देऊन करण्यात आला यावेळी अंढेरा पशुवैद्यकीय प्रभारी अधिकारी  डॉ संदेश राठोड व सहकारी संदीप वाडेकर, अजय जाधव,दीपक आंधळे,देवानंद मुंढे,महमूद शहा,पवन बेदाडे,प्रवीण मोरे, यांनी पाडळी शिंदे येथे ४५०तर मेंडगाव येथे ३३०जनावरांना लसीकरण करण्यात आले व अंढेरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत येणारी उर्वरित गावात सुद्दा लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ संदेश राठोड यांनी दिली.यावेळी शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते व त्यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले लसीकरण प्रसंगी माजी सरपंच वसंतराव शिंदे,शिवशंकर शेळके,नितीन शिंदे,प्रमोद शिंदे,शिवाजी शिंदे,विष्णू शिंदे,संभाजी देशमुख, गजानन शिंदे,विठ्ठल शिंदे,समाधन शिंदे,विजय जाधव यांच्या आदी उपस्थित होते.

Share

Other News