## कर अन्यायकारक असल्याची जनमानसात भावना...
प्रती,
मा आमदार सुधीरदादा गाडगीळ
मा गीताताई सुतार,महापौर
मा आनंदराव देवमाणे,उप महापौर
विषय :- अन्यायी उपयोगकर्ता कर परत लावल्याबद्दल
महोदय
गेल्या वर्षी 2019 मध्ये सा मि कु महानगरपालिका ने उपयोगकर्ता कराच्या नोटिसा शहरातील नागरिकांना दिलेल्या होत्या त्याला मनपा क्षेत्रातील नागरिकांनी प्रचंड मोट्या प्रमाणात आंदोलने करून विरोध दर्शविला होता त्याचा परिणाम म्हणून महानगरपालिका सभेत सदर काराला विरोध करून राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्याचे ठरलेले होते
आता मागील वर्षी येऊन गेलेला महापूर व मार्च पासून कोविड-19 मुळे शहरातील व्यापार मोडखलीला आलेला आहे .अश्यातच अन्यायकारक उपयोगकर्ता कर लाधला जात आहे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे
तरी तात्काळ हा अन्याय कारक कर हटवून नागरिकांना दिलासा देण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनावर राहील
सर्व पक्षीय उपयोगकर्ता कर हटाव कृती समिती
प्रत माहितीसाठी
मा नाम जयंतराव पाटील
पालकमंत्री, सांगली जिल्हा
मा जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा
मा आयुक्त ,सा मि कु महानगरपालिका