त्या हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी

  • गोकुळ दंतराव (Dhanegaon )
  • Upadted: 23/09/2020 4:06 PM

ता प्रतिनिधी   ( दि २३ ) वलांडी (सगीर मोमीन) : होळ तालुका केज जिल्हा बीड येथे  मुस्लिम समाजातील नागरिकांवर हल्ला करनाऱ्या समाजकंटक  दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समिती शाखा वलांडी च्या वतीने गृहमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देऊन करण्यात आली.
 दिनांक 16 सप्टेंबर रोजी धारूर येथील तबलिग जमातचे अमीर साहब(प्रमूख)काझी निजामूंदीन व त्यांचे साथीदार अंबाजोगाई येथे एका अंत्यविधी कार्यासाठी जात असताना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या कारमध्ये तांत्रिक अडचणी, बीघाड झाल्याने ते रस्त्याच्या बाजूला थांबले होते. या वेळी काही अज्ञात समाजकंटकांनी जातीवाचक व धार्मिक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्रानघातक हल्ला केला. या हल्ल्यात काझी निजामूंदीन व सोहेल तांबोळी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाने हल्ला होणे खूप चींताजनक बाब आहे या पूर्वी पुण्यात मोहसीन शेख व पालघर येथे साधूंची मॉबलिंचिंग द्वारे हत्या करन्यात आली होती.आता धारूरच्या लोकांना धर्माच्या अधारावर मारहाण करणे म्हणजे   मॉबलिंचिंगचाच भाग आहे. व ही एका प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावर हल्ला करणेच आहे.जिल्ह्यात व राज्यात कायदा व व्यवस्था बिघडेल व सामाजिक वातावरण दूषित होईल या अनूषंगाने धर्माच्या नावावर हल्ला करून दहशत निर्माण करणार्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी समिती तर्फे करण्यात आली.
यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे वलांडी शाखाध्यक्ष सगीर मोमीन, यासिन मुरशेद, ग्रा.प.सदस्य धनराज बनसोडे,मौलाना इब्राहिम तांबोळी, साबेर पठाण इत्यादी उपस्थित होते.

 खोचक प्रश्न अचूक उत्तर कायदयाने.!     
   "भारतीय माहिती अधिकार"

बातम्या साठी संपर्क करा
गोकुळ दंतराव
देवणी  प्रतिनिधी 
https://wa.me/919607183295

Official web site
www.bhartiyamahitiadhikar.com
Official email id

Share

Other News

ताज्या बातम्या