ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कंगनाकडून ट्विटमध्ये झाली मोठी चूक! नेटकऱ्यांनी घेतला कंगनाचा समाचार

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 9/16/2020 12:25:35 PM


अभिनेत्री कंगना राणावत फिल्म इंडस्ट्रीविषयी विधाने करण्याचे थांबवत नसून ट्विटरवरून ती अनेकांवर यासंदर्भात टीकास्त्र सोडत आहे.
मात्र आज कंगनाने केलेल्या एका ट्विटमुळे तिला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले असून नेटकऱ्यांनी तिचा अत्यंत खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.
          प्रकरण काय? :
▪️ कंगनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला आहे. यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली.
▪️ कंगनाने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “इंडस्ट्री फक्त करण जोहर आणि त्याच्या वडिलांनी उभी केलेली नाही. बाबासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार आणि मजुराने उभी केली आहे.'
दरम्यान, वरील वाक्यावर संतापलेल्या नेटकऱ्यांनी कंगनाला नशेमध्ये ट्विट करत जाऊ नकोस असा सल्ला दिला. तर अनेकांनी तिला 'तुला ज्या क्षेत्राने मोठे केले त्या क्षेत्राच्या जनकाचे नाव माहित नसावे हे दुर्दैवी असल्याचे' म्हटले आहे.

Share

Other News