उदगीर येथे नवीन पंचायत समिती कार्यालय उभारणीसाठी 9 कोटीचा निधी देणार - राज्यमंत्री संजय बनसोडे

  • गोकुळ दंतराव (Dhanegaon )
  • Upadted: 15/09/2020 7:45 PM

                                     दिनांक :-15 सप्टेंबर 2020

उदगीर येथे नवीन पंचायत समिती
कार्यालय उभारणीसाठी 9 कोटीचा निधी देणार
                              - राज्यमंत्री संजय बनसोडे

            लातूर, प्रतिनिधी ):-जिल्हयातील उदगीर येथे नवीन अद्यावत पंचायत समिती कार्यालय उभाणीसाठी राज्य  शासन 9 कोटीचा निधी देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे  पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. 
          पंचायत समिती उदगीर येथील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीच्या   अध्यक्षस्थानावरुन राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. या बैठकीस नवनिर्वाचित पंचायत समितीची सभापती प्रा.शिवाजीराव मुळे, उपसभापती बाळासाहेब मरापल्ले, पंचायत समितीचे सर्व सदस्य,कल्याण पाटील, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उदगीरचे तहसीलदार व्येंकटेश मुंडे उपस्थित होते.
         यावेळी कृषी, आरोग्य, शिक्षण  विभागातील विविध विषयाचा आढावा घेण्यात आला . उदगीर  येथील शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. शालेय पोषण आहार,गुणवत्ता पुरक असावा याबाबत राज्य मंत्री श्री.बनसोडे यांनी निर्देश दिले. 
       पंचायत समितीच्या प्रत्येक सदस्यांना येणाऱ्या काळामध्ये वृक्षरोपन करण्यासाठी दोन हजार रोपे देण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य यांनी केली. आमदार-खासदारांना आपल्या मतदारसंघातील विकास कामासाठी विकास निधी दिला जातो त्या प्रमाणे पंचायत समिती सदस्य,  जिल्हा परिषद सदस्य याना हक्काचा फंड असावा याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री.बनसोडे यांनी सांगितले.
        पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व आंगणवाड्या ISO करण्यात येणार आहेत यासाठी सर्व मदत केली जाईल जनतेचा निधी योग्य खर्च झाला पाहिजे. महावितरण कंपनीच्या काही तक्रारी आहेत शेतकऱ्यांना विद्युत नवीन कनेक्शनसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे कोविड च्या पार्श्वभूमीवर शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना राबविण्यात येत आहे यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, तसेच नगरपालिका कर्मचारी याचे पथक तयार करण्यात आली आहेत ही पथके प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी करणार आहेत. मनरेगा अंतर्गत ज्या नागरिकांनी विहीर मंजूर करण्यात आल्या आहेत त्याच्या नोंदी सातबारा नोंदी घेण्यात येतील अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
यावेळी उदगीर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारत, मनरेगा अंतर्गत वैयक्तीक विहिरींना तात्काळ आदेश देणे, बांधकाम कामगार मजूर नोंदणी करण्यात येणारे अडथळे तसेच ग्रामीण भागातील महावितरण संबंधति अडचणीची तात्काळ सोडवीणे, ट्रॉन्सफॉर्मर व इतर साहित्य पुरवीणे, तालुक्यातील जलजीवन मीशन योजनेस गती देणे, रोजगार हमी योजनेची कामे व घरकुल योजनेस लागणाऱ्या निधीबाबत या बैठकीत  चर्चा करुन संबंधित विभागाने ताबडतोब कार्यवाही करण्याच्या सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी दिल्या.
                                             

खोचक प्रश्न अचूक उत्तर कायदयाने.!    
   *"भारतीय माहिती अधिकार"*

*बातम्या साठी संपर्क करा*
*महादेव कळसे*
*निलंगा  प्रतिनिधी

Share

Other News

ताज्या बातम्या