ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वाटपाने सेवा सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 9/15/2020 9:00:47 AM

गडचिरोली:-

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने    राबविण्यात येणाऱ्या सेवा सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ  चामोर्शी येथील मार्कांड मोहला शिवाजी  महाराज चौक परिसरात आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वाटप करून करण्यात आला.

येत्या १७ सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात दिनांक १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर  या दरम्यान सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे .या निमित्याने तिन्ही तालुक्यात प्रत्येकी ७० गावांत वृक्षारोपण,७० गावांत स्वच्छता अभियान,  रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर, गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने  पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत पथ विक्रेत्यांना १० हजार रुपयांचे कर्ज भांडवल लाभार्थ्यांना वितरण यासह विविध आयोजन करण्यात येत आहे त्याचाच शुभारंभ आज आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वाटप करून करण्यात आला.

यावेळी चामोर्शी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा तालुका महामंत्री साईनाथ बुरांडेयुवा नेते आशिष पिपरे प्रतीक राठी, जयराम सावकार चलाख व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निखिल राखडे (गडचिरोली प्रतिनिधी) 

7774807014

Share

Other News