*चंन्द्रपुर : 3 ऑगस्ट रोजी सकाळी एसीसी सीमेंट कारखान्याच्या गेट समोरील परिसरात कामगारांनि केले आंदोलन*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 04/08/2020 5:09 PM

चंद्रपुर  प्रतिनिधि,
घुग्घुस येथून जवळच्या एसीसी सीमेंट कारखान्यात पॉवर प्लॅन्ट मधे 78 कंत्राटी कामगार मागील पंधरा वर्षापासून कार्यरत असून कोरोना मुळे लॉकडाउन च्या काळात त्यांना जवळपास तीन ते चार महिन्यापासून पंधरा ते सोळा ड्युटी मिळत असल्याने कामगारांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. मासिक सात हजार पर्यंत मिळत असलेल्या या तुंटपुज्या पगारामुळे परिवाराचा खर्च भागविणे सुद्धा कठीण झाले आहे. मात्र दुसरीकडे कारखान्यातिल इतर कंत्राटदारा च्या कामगार मंडळी ना महिन्यात पूर्ण डयूटी आणि पुरेसे वेतन देण्यास प्रारंभ झाला आहे.
अवनीश लॉजिस्टिक प्रायवेट लिमिटेड च्या या 78 कामगाराना सुद्धा इतर कंत्राटदारांच्या कामगारां प्रमाणे पूर्ण सव्वीस ड्युटी देण्यात याव्या व इतर काही मागन्या करिता दी 3 ऑगस्ट रोजी सकाळी एसीसी सीमेंट कारखान्याच्या गेट समोरील परिसरात कामगारांनि आंदोलन केले. सायंकाळी सहा वाजता घुग्घुस पोलिस स्टेशन चे ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन कामगारांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. उद्या या विषयावर प्रबंधनाने कामगारां सोबत चर्चा करण्याची तैयारी दर्शविल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे असे कळते.

Share

Other News

ताज्या बातम्या