चंद्रपुर:-तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना रामनगर पोलीसानी केली अटक*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 03/08/2020 8:08 PM

चंद्रपुर:-तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना रामनगर पोलीसानी अटक केली आहे.आज दिनांक 2/8/20 रोजी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संजय नगर एम ई एल कंपनी रोड चंद्रपूर परीसरात येथे एक इसम हातात तलवार घेऊन फिरत आहे अशा माहितीवरून संजय नगर स्नेह मंच समोर रोड चंद्रपूर येथे पेट्रोलिंग दरम्यान आरोपी नामे बरकत सिंग दारासिंग डांगी वय 30 वर्ष रा. इंदिरानगर चंद्रपुर व मुन्ना रामू जाधव वय 19 वर्ष राहणार संजय नगर चंद्रपुर हे आपले ताब्यातील सुपर स्प्लेंडर मो.सा.क्र.एम एच ३४ए डि 2178 या मोटरसायकलवर बसून हातात बेकायदेशीररीत्या तलवार घेऊन फिरत असता मिळून आले त्यांचे ताब्यातून व अंगझडतीत खालीलप्रमाणे मुद़देमाल बेकायदेशीररीत्या बाळगुन मिळुन आल्याने अप क्र.736 /2020 कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
१)1नग तलवार किं अं 3000/-रू
२) गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल किं अं 35,०००/-रू
3) 2नग मोबाईल संच कि.अं 5000रू
4 ) नगदी रक्कम 11,240रू असा एकुण ,54,240/-रू चा मुद़देमाल हस्तगत करण्यात आला.ही कारवाई पोलीस निरीक्षक हाके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभुदास माहुलीकर, सपोनी संतोष दरेकर,नापोशी शंकर येरमे,नापोशी रामभाऊ राठोड,पोशी माजीद खा पठाण,पोशी निलेश मुडे यांनी केली आहे

Share

Other News

ताज्या बातम्या