वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अलमला ग्रामपंचायतीस 25 ट्री गार्ड भेट*

  • रिजवान मकानदार (Latur)
  • Upadted: 03/08/2020 7:42 PM

लातूर:
 अलमला येथिल ग्रामपंचायत कार्यालयाच्या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी वंचित बहुजन आघाडी लातूर च्या वतीने 25 झाडाच्या संरक्षक जाळ्या भेट देण्यात आल्या यावेळी 25 वृक्ष लागवड करून त्यांना ट्री गार्डचे लोकार्पण करण्यात आले. 
हे लोकार्पण
 वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव भिंगे,ज्ञान प्रबोधनी अकॅडमी चे संचालक सुधीर पोतदार सर व वंचित बहुजन आघाडीचे श्री माने सर , शिवरुद्र बेरुळे यांच्या हस्ते आज आलमला येथे करण्यात आले.
याप्रसंगी अलमला चे सरपंच कैलास निलंगेकर, उप सरपंच बाबूसिंह ठाकूर, ग्रामविकास अधिकारी विलास चौधरी,पत्रकार जयपाल ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार कदम,बापू लांडगे,सोमनाथ अंबुलगे , खंडेराव कोकाटे , दिनकर मुळे, कल्याण कापसे,गंगाधर वाघमारे,शाहिद मुलानी,शरद कदम उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या