महाड तालुक्यामध्ये कोरोनाचे 37 नवे रुग्ण ; एकाचा मृत्यू

  • M.Samir Mahadkar (Mhasla )
  • Upadted: 01/08/2020 8:17 PM

बाधित रुग्णांची संख्या 453 वर

महाड तालुक्यात आज एकाच दिवशी नव्याने 37 रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात एका रुग्णाने कोरोनावर मात केली. आजअखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 453 झाली आहे.

महाड तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागायला आहे. आज नोंद झालेल्या 37 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये रेणुकानिवास प्रभात कॉलनी महाड येथील 25 वर्षीय तरुणी, गोमुखेआळी 19 वर्षीय तरुणी, आकांक्षा अपार्टमेंट काकरतळे येथील 22 वर्षीय तरुण, राजेवाडी येथील 72 वर्षीय वृद्ध महिला, अरुणनगर नांगलवाडी येथील 19 वर्षीय तरुण, अप्परतुडील येथील 42 वर्षीय व 57 वर्षीय पुरुष, काकरतळे येथील 22 वर्षीय तरुणी, पिडीलाईट कॉलनी येथील 25 वर्षीय तरुणी, 47 वर्षीय महिला, 59 वर्षीय व्यक्ती व 25 पुरुष वर्षीय तरुण, गितांजली बंगलो नांगलवाडी येथील 61 वर्षीय वृद्ध, कांबळे तर्फे बिरवाडी येथील 20 वर्षीय तरुणी, 44 वर्षीय महिला, तांबडभुवन महाड येथील 65 वर्षीय वृद्ध महिला, शारदा कॉम्प्लेक्स बिरवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, सावित्री नवेनगर महाड येथील 72 वर्षीय वृद्ध महिला, सेवयानी हॉस्पिटल जुना पोस्ट येथील 68 वर्षीय पुरुष, अष्टविनायक चवदारतळे येथील 33 वर्षीय तरुण, कांबळे तर्फे बिरवाडी येथील 49 वर्षीय, 22 वर्षीय, 20 वर्षीय, 40 वर्षीय व 21 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, खानवली बिरवाडी येथील 46 वर्षीय पुरुष, प्रथमेश अपार्टमेंट तांबडभुवन महाड येथील 52 वर्षीय पुरुष, बिरवाडी येथील 66 वर्षीय पुरुष, काळीज येथील 42 वर्षीय, 24 वर्षीय पुरुष, मोहल्ला महाड येथील 32 वर्षीय पुरुष, विठ्ठल रखुमाई सो. महाड येथील 30 वर्षीय पुरुष, कोळोसे येथील 48 वर्षीय पुरुष, किंजळघर येथील 28 वर्षीय पुरुष, मधली आळी वसंत अपार्टमेंट येथील 70 वर्षीय पुरुष, शिंदेकोंड येथील 75 वर्षीय वृद्ध यांचा समावेश आहे.

आज राजेवाडी येथील 72 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एका रुग्णाने कोरोनावर मात केली. दरम्यान, आजअखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 453 वर पोहोचली आहे. यापैकी 299 रुग्ण बरे झाले असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 130 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या