ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

◆ *4 लक्ष ₹ चा जिप निधी मिळूनही बांधकाम नाही* ◆ *राजूर ग्रापं कडे तक्रार व 7 दिवसात बांधकाम करण्याची मागणी...*


  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 1/24/2023 2:50:45 PM

◼️ 4 लक्ष ₹ चा जिप निधी मिळूनही बांधकाम नाही.
◼️ राजूर ग्रापं कडे तक्रार व 7 दिवसात बांधकाम करण्याची मागणी...

राजूर कॉलरी : येथे मुस्लिम धर्मियांची स्वतःची कब्रस्थान असून त्याची जोपासना मुस्लिम बांधवांकडूनच केल्या जाते. परंतु ह्या कबरस्थानाला वॉल कंपाउंड नसल्याने येथील जि प सदस्य संघदीप भगत यांनी पाठपुरावा करून वॉल कंपाउंड च्या बांधकामासाठी 4 लक्ष रुपयाचा निधी मिळवून दिला. परंतु ह्या वॉल कंपाउंड चे बांधकामचं न केल्याने मुस्लिम बांधवांनी राजूर ग्रापं ला निवेदन देऊन त्वरित बांधकाम करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सन 2021-2022 ह्या आर्थिक वर्षात येथिल जिप सदस्य संघदीप भगत यांनी मुस्लिम बांधवांची गरज ओळखून येथील कब्रस्थान ला पाठपुरावा करून 4 लक्ष रुपये किंमतीचा निधी वॉल कंपाउंड च्या बांधकामासाठी मिळवून दिला. हा निधी मंजूर असूनही बांधकामास का सुरुवात करण्यात आली नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच शेवटी मुस्लिम बांधवांनी राजूर ग्रापं ला निवेदन देऊन त्वरित बांधकामास सुरुवात करावी अशी मागणी केली आहे. येत्या 7 दिवसात बांधकामास सुरुवात न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून मो. असलम, रियाजुल हसन, खालिद, मोसिम, मुंसाद, सलीम सिद्दीकी, अक्रम सिद्दीकी, जाबिर खान आदींनी दिला आहे.

Share

Other News