शहरातील चौक सुशोभीकरणाबाबत मिरज सुधार समितीचा आक्षेप...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/11/2022 5:37 PM

मिरजेतील सुशोभीकरणाला विरोध नाही... पण जे चुकीचे घडत आहे त्यावर बोललं पाहिजे...

छत्रपती शाहू महाराज चौक आणि कर्मवीर भाऊराव पाटील चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कोणतेही चौक सुशोभीकरण करताना भविष्यात वाहतूक कोंडी किंवा वाहतूक अडचण निर्माण होऊ नये म्हणून महापालिका नगररचना विभागाचा अभिप्राय महत्त्वाचा असतो जसे एखादी बिल्डिंग बांधताना नगररचना विभागाची परवानगी अनिवार्य असते... भर चौकात एखादे बांधकाम करत असताना नगररचना विभागाचा अभिप्राय आवश्यकच आहे... मात्र, शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक असो की अन्य चौकात सुशोभीकरणच्या नावाखाली झालेले बांधकाम नियमानुसार म्हणजे कायदेशीर आहे का??? याबाबत प्रश्नचिन्ह आहे... शाहू चौक तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारीत येतो... चौकात बांधकाम करताना ना महापालिका नगररचना किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभिप्राय घेण्यात आला नाही... त्यामुळे भविष्यात रस्ता रुंदीकरणासाठी ही स्मारके काढावी लागली तर, हे या दोन्ही महापुरुषांचा अवमान तर होणार नाही का...? हा प्रश्न आहे... आपलं विरोध नाही... पण जे चुकीचे आहे ते बोलायलाच पाहिजे ना... 🙄🙄

Share

Other News

ताज्या बातम्या