कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ' माझे संविधान कार्यक्रम साजरा.

  • Sharad mali (KOLHAPUR)
  • Upadted: 28/11/2022 12:28 PM


   भारतीय राज्यघटनेने सर्वाना समान हक्क दिले आहेत असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक न्यायाधीश मा . श्री . ए .एस . गडकरी यांनी केले .  जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे अध्यक्ष मा . श्रीमती .के .बी . अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी 10.30 वाजता करवीर निवासिनी सभागृह, न्याय संकुल, कोल्हापूर येथे  संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन  करण्यात आले. 
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्याय मुर्ती व जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती मा . श्री. ए . एस .गडकरी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर तर्फे माझे संविधान हा कार्यक्रम पार पडला .
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा मा. श्रीमती . के .बी अग्रवाल यांनी भारतीय राज्यघटनेचे महत्व विशद करून  भारतीय संविधान केवळ त्यातील शब्द नव्हते , तर या देशातील व्यक्ती  केंद्रस्थानी मानून , स्वातंत्र्य आणि समतेची आस धरणारा एक जिवंत  दस्त ऐवज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास कोल्हापूररातील इतर न्यायीक अधिकारी यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन मा. प्रितम पाटील सचीव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर न्यायाधीशांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या