महाराष्ट्राचे तुकडे करून भाजपला काय साध्य करायचे आहे ? : शिवसेना युवा नेते भगवानदास केंगार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/11/2022 3:34 PM


महाराष्ट्रात नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांमध्ये अनेक वाचाळ वीर नेत्यांनी आपली लायकी दाखवून देत आहेत.. त्यातच दोन दिवसांपूर्वी भाजपचा कोट घालून वकिली करणारा गुणरत्न सदावर्ते यांनी आपली लायकी महाराष्ट्राला दाखवून दिली..
भाजपच्या जे पोटात आहे ते सदावर्ते च्या त्यांच्या मुखातून बाहेर पडले.. संयुक्त महाराष्ट्र एकसंघ-अखंडपणे राहण्यासाठी 106 हुतात्मा  शहीद झाले त्यांनी महाराष्ट्रासाठी काय यातना भोगली.. ते या भाजपचा काळा कोट घालून वकील करणारा दलालाला काय माहित..?
भाजप गुणरत्न सदावर्ते याला पुढे करून विदर्भ. मराठवाडा. व मुंबई. वेगळी करण्याची भाषा करतो.. या महाराष्ट्राच्या लचके तोडून भाजप काय देशहित व महाराष्ट्रा़चा विकास साध्य करणार आहे.. ही चाल फार दिवसापासून भाजपच्या अजेंड्यावर आहेच.. त्यालाच आता महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन व केंद्रातील सत्ता यामुळे या त्यांच्या कुजक्या राजनीतिला खतपाणी मिळत आहे.. आज सदावर्ते विदर्भ-मराठवाडा वेगळे मागतील.. उद्या कोकणातले नारायण राणे साहेब कोकण वेगळे करा म्हणतील.. मुंबईतील  गुजरात उद्योगपतींनी मुंबई गुजरातला जोडा म्हणतील.. ते तसे त्यांचे प्रयत्न चालूच आहेत.. हे सर्व राजकीय डावपेच महाराष्ट्राचे होणारे हाल महाराष्ट्रातील मराठी माणूस सहनच करणार का..?
महाराष्ट्रातील राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्याला पहिल्यांदा याच मातीत गाढला पाहिजे तोपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे मनसुबे उधळणार नाहीत.. कोणीही उठतो काही बोलतो.. महाराष्ट्राच्या व महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल महाराष्ट्राच्या थोर महापुरुषांच्या बद्दल. अगदी राज्यपालांच्या पासून अनेक वाचाळीवर नेत्यांच्या पर्यंत काही पण बोलून आपली लायकी जगासमोर प्रसिद्ध करत आहेत.. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या मराठी माणसानी  या महाराष्ट्रातील वाचाळवीर लायकी शून्य नेत्यांची नोंद घेऊन ठेवुन.. येत्या महानगरपालिका. जिल्हा परिषद.या विधानसभा व लोकसभा या निवडणुकीत यांची लायकी दाखवून देणे गरजेचे आहे.. काही दिवसापूर्वी राज्यपालांनी अनेक चुकीचे वक्तव्य केले गुणरत्न सदावर्ते हा माथेफिरू काही पण बरळतो  मग यांच्यावर कारवाई का होत नाही.. ते सरकारचे जावई आहेत का..?
असा सवाल शिवसेना युवा नेते भगवानदास केंगार यांनी पत्रकार द्वारे केलेली आहे..

Share

Other News

ताज्या बातम्या