*एका जहाल नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 30/09/2022 6:49 PM

दिनांक- 30/09/2022
          उपविभाग अहेरी अंतर्गत येणा­या उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीत मौजा कापेवंचा जंगल परिसरात विलय दिन सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे 30 ते 40 नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने दिनांक 28/09/2022 रोजीच्या सकाळी एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन मौजा कापेवंचा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-60) जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक 28/09/2022 रोजीचे सायं. 7:00 ते 8:00 वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या 30 ते 40 नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला, जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. सदर नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ¬ा प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. 
      चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळावर 01 नक्षल मृतदेह मिळुन आले. तसेच मृतदेहासोबत 8 एमएम रायफल व मोठ¬ा प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. नक्षल मृतदेह जिल्हा मुख्यालय येथे आणले असता, सदर मृतदेह हे काळे-हिरवे कपडे घातलेल्या महिला नक्षलीचा असून, तिची ओळख पटविणे सुरू आहे.
      माहे आक्टोबर 2020 रोजी पासून ते आतापर्यंत एकुण 55 नक्षलवादी विविध चकमकीत ठार झाले असून, 46 नक्षलवादी अटक व 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 
      सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे साो.,मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख साो. व मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे साो. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री.अंकित गोयल साो. यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षल विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या