ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

काळ सोकावून केंव्हाच मेला , ज्यांनी हया वृध्देला टाकलं...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/30/2022 7:44:41 AM

*म्हातारी मेली तरी चालेल* 

म्हातारी मेली तरी चालेल पण 
काळ सोकावयाला नको अशी आपल्याकडे म्हण आहे  मित्रांनो 
पण शब्दशाः म्हातारी मरायला हवी का ? 
आज सावली बेघर निवारा केंद्रा समोर कोण दोन अज्ञात व्यक्तीनी एका म्हातारीला आणून अक्षरशः संस्थेच्या दारात टाकून पळ काढला आहे. 
हा काळ सोकावयाचा काळ नाही कसं म्हणणार सांगा ? 
१ आॕक्टोंबर हा जागतिक वृध्दसेवा दिन आहे आणि अवघ्या दोन दिवस अगोदर अशी घटना घडते आहे हे किती घृणास्पद कृत्य आहे 
नवरात्रीचा उत्सव जोरदार चालू आहे.आई भवानी आई आंबाबाई, आई रेणूका,अशा कितीतरी आदीशक्तीची आपण रोज मनोभावे पुजाअर्चा करतो कशासाठी हा प्रश्न गरब्याचा फेर धरावा असा भोवती सतत फिरत राहतो 
रोज एका रंगाचे कपडे घालणाऱ्या महिलांना रोज पाहताना त्यांच्या रंगीबेरंगी झगमगाटात काळी बाजू आपल्याला दिसत नाही याची खंत मनात घर करते.
पायात चप्पल न घालता अनेक तरूणही हल्ली आपल्याला दिसतात पण काढलेले पायताण आज आपल्याच तोंडावर मारून घेण्यासारखी कृती कोणी केkpली असेल ? 
का कशासाठी असे अनेक प्रश्न उभे राहतात त्या म्हातारीला अश्रा मिळेल सेवा मिळेल वैद्यकीय मदत मिळेल परंतु तिला आपल्यालाच माणसांनी असं का केलं या प्रश्नांची उत्तरे मात्र आज मुस्तफाकडे नाहीत.
कुठं चाललो आहोत आपण 
की आपल्या स्वार्थी आणि भौतिक सुखाच्या भोवतीच आपण फेर धरणार आहोत का ? 
आपला परीघ मोठा व्हायला हवा.दृष्टी व्यापक व्हायला हवी सेवाआस्थेची व्हायला हवी.
हा सोकावणा-या काळाला  म्हातारीच काही देणंघेणं नाही तेव्हा विचार करा मित्रांनो 
समाजभान म्हणून आपली जबाबदारी वाढते आहे.
डेटापॕक मारून केवळ दैनंदिन दिवशी संवेदना व्यक्त करणाऱ्या पोस्ट लिहिणे फोटो अपलोड करणे म्हणजे समाजसेवा नाही या पलिकडे  पाहायची नवी दृष्टी हवी इतकेच वाटतं 

अभिजित पाटील

👆......👇
संवेदना तर केव्हाच मेलेली सतत दिसते,
काळ केव्हाच सोकावलेला आहे,
ज्यानी ह्या वृद्धेला टाकलं, त्यांच्या स्त्रियांना हे कळत नसेल असं म्हणणं म्हणजे वेडेपणा आहे!
काही वेळा स्त्रियाच या स्त्रियांच्या शत्रू असल्याची जाणीव होते, त्यांना आईचा अभिमान वाटतो पण सासू कचरा वाटते,
रोजच्या टि.व्ही. मालिकेत तरी दुसरं काय असतं!
सतत काही तरी कटकारस्थान,
अशा काही सवंग स्त्रियापुढे एखादा मर्द नवरा हतबल होताना दिसतं!
पण हे वास्तव आहे,
जसं आईवडीलांचा,बहिणींचा व, सासूसासरे यांचा सन्मान नवरा करत असेल तर बायकोने त्याच्या आईवडीलासहीत सर्वांना प्रेम देणं हे कर्तव्य आहे,
यात काही गडबड झाली तर,
अशी वेळ येतच जाणार!
कर्माची फळं तर सर्वांना केव्हाही भोगावीच लागणार!
🙏

Share

Other News