नकाशे नाहीतर माणसं महत्वाची : नगरसेवक अभिजीत भोसले

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/06/2022 10:49 AM

#विकासाची_भूमिका_नकाशा_नसतो_ठरवत
#कागदावरच्या_नकाशारेषाहून_माणसं_महत्वाची
#नकाशे_केवळ_कागदावर_न

हरिपूर अंकली इनाम धामणी जुनी धामणी आणि बामणी या पाच गावासोबत हसनी आश्रम पासून हरिपूर रोड काळी वाट पर्यंत च्या संपूर्ण परिसराला आणि मुख्यत्वे शामराव नगर सारख्या भागाला ज्या नाल्यांच्या मोकळ्या श्वासाने भविष्यात विकासाचा मोकळा श्वास घेता येईल ते दोन्हीही नाले खुले करण्यासाठी आज या सगळ्या गावांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सगळे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोल पाटील, ग्रामस्थ यांची मिटिंग पार पडली, त्या मिटिंग मध्ये हे नाले खुले करण्यासाठी सर्वकष चर्चा झालत्या वेळेस सगळ्यासमोर मी माझी भूमिका मांडली. त्याला सगळ्याच जणांचे अनुमोदन सुद्धा मिळाले.
या नाल्यांच्या खुल्या होण्याने पुढील भविष्यात ज्या समस्या समोर येतील त्यासाठी आजच काम करणे गरजेचं आहे हे सर्वासमोर मांडले आणि त्यानंतर सांगली पासून बामणी पर्यंत संपूर्ण नाला पाहणी केली.त्यावेळेस या मिटिंग च्या अध्यक्ष स्थानी मा तहसीलदार कुंभार साहेब, अप्पर तहसीलदार पाटील मॅडम, इरिगेशन चे मुंजप्पा, सगळ्या गावचे तलाठी ग्रामसेवक, सुहास आप्पा पाटील, रज्जाक नाईक,महावीर पाटील, अभय पाटील, विकास हाणबर,विनोद सूर्यवंशी, ग्रामीण पी आय गायकवाड साहेब आणि ग्रामस्थ मित्र परिवार उपस्थित होते.
   अंकली नाला, आणि हरिपूर जॅकवेल नाला दोन्हीही नाल्यांना खुले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय आणि तोवर करत राहिल जोवर मी यात यश मिळवत नाही कारण हा प्रश्न या पाच गावांचा आणि सांगली शहराचा आहे, म्हणून मी म्हणलं

"नकाशे केवळ कागदावर नियोजनाचा भाग असतात, बाकी माणसं महत्वाची."

चला सर्वांनीच मिळून भविष्यात आपला विकासाचा मार्ग खुला करूयात, नाले खुले करूयात, निसर्गाला श्वास घेऊद्यात.

Share

Other News

ताज्या बातम्या