झालेल्या कामाची पुन्हा निविदा , मिरज सुधार समितीने उघडकीस आणला मिरज मनपातील गैरप्रकार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/06/2022 8:54 AM


महापालिका मिरज विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांचे  केबिन सुधारणा करण्याच्या नावाखाली निविदा काढून सुमारे तीन लाख रुपयांचा आर्थिक लुटीचा गैर प्रकार मिरज सुधार समितीने उघडकीस आणला आहे. याबाबत मिरज सुधार समितीने अतिरिक्त आयुक्त संजय ओहोळ यांच्याकडे तक्रार केली आहे. 
 तक्रारीत म्हटलं आहे, मिरज विभागीय कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्यासह दोघांचे स्वीय सहाय्यक यांचे केबिन सुधारणाचे काम गेल्या वर्षी झाले आहे. असे असताना बांधकाम विभागाने पुन्हा हेच काम करण्यासाठी निविदा जाहीर प्रकटन क्र.20/21-22 दि. 24/06/2022 रोजी निविदा प्रसिध्द केली होती. 
याबाबत मिरज सुधार समितीने माहिती घेतल्यानंतर हे काम गतवर्षी झाले आहे. पुन्हा नदाफ नावाचा ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी संगनमत करून सुमारे तीन लाखांची निविदा मॅनेज करून आर्थिक लुटीचा घाट घातला होता. मात्र, याबाबत सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी यांनी अतिरिक्त आयुक्त संजय ओहोळ यांच्याकडे तक्रार करून याची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या