ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

लोणार शहरातून रात्र-भर सुरू असलेली रेती वाहतूक बंद करा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा-भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी


  • Kute Ganesh (At Titavi ta लोणार )
  • Upadted: 5/23/2022 9:27:17 PM

*लोणार शहरातून रात्र-भर सुरू असलेली रेती वाहतूक बंद करा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा-भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी*

लोणार/ गणेश कुटे 

   लोणार शहरातून रात्रभर सुरू असलेली वाहतूक बंद करवी या विषयाची तक्रार भाजपा लोणार शहराध्यक्ष गजानन मापारी यांनी आज दिनांक 23 मे रोजी तहसिलदार लोणार व त्याची प्रत ठाणेदार पोलीस स्टेशन लोणार यांना दिली आहे. मराठवाड्याच्या रेती घाटावरून दिवस रात्र हजारो वाहने लोणार शहरातून तहसील कार्यालय हद्दीतून जात आहेत. सदर वाहनांना ती वाहतूक करण्यासाठी वेळ ठरवून दिलेला आहे,परंतु रेती माफिया शासनाने ठरवून दिलेल्या नियमाला बगल देऊन दिवस-रात्र एकाच रॉयल्टीच्या पावतीवर रेती वाहतूक करीत असतात तसेच रेती माफिया व त्यांचे रोडवर उभे राहत असलेल लोकेशन देणारे आम्ही तहसीलदार यांना हप्ते देत असल्यामुळे आम्हाला कोणीही अडवू शकत नाही, असा मोठ्या आवाजात दम देतात व कायद्याच्या धमक्या दिल्या जातात. तेव्हा अशा मुजोर रेती माफियावर कारवाई होणे गरजेचे आहे.    
  रेती माफिया यांच्यावर कारवाई न झाल्यास रेती माफिया यांच्याविरोधात जन आंदोलन छेडण्यात येईल जन आंदोलनाच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपण व आपल्या प्रशासनाची राहील.असे तक्रारकर्ते भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी यांनी तक्रारीच्या अंती इशारा दिला आहे.सदर तक्रारीच्या अनुषंगाने काय कारवाई होणार याकडे लोणार वासियांचे लक्ष लागले आहे.  एव्हढे मात्र खरे !

Share

Other News