ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

विध्यापीठाचा अजब फतवा , राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा फतव्याला विरोध...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/21/2022 2:21:40 PM


  *निवेदनाद्वारे तीव्र आंदोलनाचा शहरजिल्हाध्यक्ष   डॉ शुभम जाधव यांचा इशारा...

सांगली दि २१,
आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने प्र. कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले . शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सगळ्या संलग्न  महाविद्यालयांना परिपत्रक काढण्यात आलेले आहे त्यामध्ये जे महाविद्यालय रौप्य , सुवर्ण , हिरक व अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या महाविद्यालयांना  विद्यापीठामार्फत कार्यक्रम घेण्यासाठी  मदत करण्यात येणार  आहे सदर मदत ही ' ज्युबिली फंड ' च्या माध्यमातून प्रति विद्यार्थी  २५ रुपये घेण्याचे परिपत्रक विद्यापीठाकडून  काढण्यात आले आहे.
      याबाबत आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव यांनी सांगली येथे  प्र. कुलगुरू यांची भेट घेऊन त्यांना हे परिपत्रक  मागे घेण्यासाठी निवेदन दिले आहे.
          यावेळी डॉ शुभम जाधव म्हणाले की गेल्या २ वर्षांपासून महाविद्यालय बंद होते , विद्यार्थ्यांनी कोणत्याही महाविद्यालयातील सोयी सुविधांचा लाभ घेतला नाही उदा . जिमखाना ग्रंथालय तरी देखील फी घेतली गेली , आता कुठे तर महाविद्यालय सुरू झाले आहेत तर विद्यापीठा कडून असे परीपत्रक काढले गेले आहे , हे विद्यार्थ्यांच्यावर अन्यायकारक असून आम्ही त्याचा निषेध करीत आहोत , निवेदन द्वारे आम्ही सदर परिपत्रक मागे घेण्याची विनंती केली आहे ,जर हे परिपत्रक मागे  घेतले  नाही तर आम्ही याबाबत तीव्र आंदोलन करणार असल्याचे डॉ शुभम जाधव यांनी सांगितले 
      यावेळी शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव शहरजिल्हा कार्याध्यक्ष शुभम ठोंबरे , सोशल मीडिया अध्यक्ष समीर टपाल , संतोष बंने ,        आदी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते

Share

Other News