ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

देवळाली एअर फोर्स स्टेशन डेपो सिविलियन कमिटीच्या व्हा. चेअरमनपदी प्रविण रोकडे


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 5/14/2022 8:30:50 AM

देवळाली एअर फोर्स स्टेशन डेपो सिविलियन कमिटीच्या व्हा. चेअरमनपदी प्रविण रोकडे 

भगुर वार्ताहर :-देवळाली २५ ईडी एअर फोर्स स्टेशन डेपो सिविलियन कमिटीच्या व्हा. चेअरमनपदी येथील कर्मचारी व नानेगांव येथील रहीवाशी प्रविण रोकडे यांची चिठ्ठी पद्धतीने निवड करण्यात आली. कैलास राजभोज व प्रविण रोकडे रोड हे दोघे मित्र एका मेकांच्या विरोधात उभे होते परंतु इतर ८ सदस्यांनी त्यांना समसमान मते देऊन निकाल स्पष्ट केला नाही त्यात  प्रविण रोकडे यांना ३ मते आणि कैलास राजभोज यांना ५ मते अशी चुरशीची लढत होऊन अंतिम निकाल हा एअर ऑफिसर कमांडींग यांच्या अंतिम मतदानावर येऊन ठेपला.एअर ऑफिसर कमांडींग नायर यांनी कुणा एकाला स्पष्ट मत न देता चिठ्ठी पद्धतीचा वापर करत या प्रकरणाला पूर्ण विराम दिला त्यात प्रविण रोकडे यांना विजय मिळाला. परंतु दोन्ही उमेदवारांनी एका मेकाना आलिंगन देत दोघांच्या मैत्रीतील प्रेम कुठेही कमी होणार नाही याची खात्री देत आनंद उत्सव साजरा केला.

यावेळी नानेगावंचे मा. सरपंच ज्ञानेश्वर शिंदे ग्रा. प.सदस्य राजाभाऊ शिंदे, ग्रा. प. सदस्य वासुदेव पोरजे, ग्रा. प.सदस्य संपत बेर्डे,विजय शिंदे, केशव कडभाने, प्रकाश आडके, योगेश काळे, संजय  शिंदे, दत्तुभाऊ शिंदे, योगेश शिंदे, काळे मामा, आदींनी यथोचित सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


सर्व सहकारी कामगार वर्ग यांना सोबत घेऊन वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक रित्या काम करणार संस्थेच्या विकासासाठी व सभासदांसाठी तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध 
प्रवीण रोकडे व्हाईस चेअरमन 
डेपो सिव्हिलियन एअरपोर्ट स्टेशन देवळाली

Share

Other News