ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सांगलीत रेशनवरील तांदुळ गायब , त्वरीत उपलब्ध करून दया : दिपक माने ( भाजपा संगठन सरचिटणीस )


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/14/2022 7:48:29 AM


  दोन महिने झाले रास्त भाव दुकानात तांदूळ उपलब्ध झाले नसलेने  सांगली जिल्हा पुरवठा आधिकारी यांना निवेदन देण्यात आले.रास्त भाव दुकानात दर महिन्याला नागरिकांना गहू व तांदूळ दिले जाते तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत गहू व तांदूळ वाटप करण्यात येते.सांगली मध्ये रास्तभाव रेशन दुकानात  गेल्या  एप्रिल महिन्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मिळणारे मोफत तांदूळ व मे महिन्यात मिळणारे नियमित तांदूळ व पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मिळणारे मोफत तांदूळ  आजअखेर  रेशन दुकानात उपलब्ध झाले नाही व त्यामुळे नागरिकांनाही ते मिळाले नाही. .तरी धान्य वाटपाबाबत नागरिकांच्या मना मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तसेच तांदूळ मिळाले नसल्याने नागरिकांची दुरावस्था झाली आहे.व याअगोदर दिलेले तांदुळ ही निक्रुष्ठ  दर्जाचे असलेबाबत तक्रारी आहेत. या सर्व गोष्टी मुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार व जिल्हा पुरवठा प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने ही रेशन दुकानात धान्य वेळेत उपलब्ध होत नाही. तरी वरील सर्व घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील रास्त भाव दुकानात तांदूळ चांगल्या दर्जाचे उपलब्ध करून द्यावेत.
तसेच धान्य पुरवठा बाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करावी  अशी मागणी करण्यात आली.अन्यथा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा  नागरिकांच्या समवेत तीव्र आंदोलन करेल.. अशा इशारा देण्यात आला. यावेळी भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष प्रियांनद कांबळे, ओबीसी युवा अध्यक्ष राहुल माने, बबलु आलमेल उपस्थित होते.

Share

Other News