ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी प्रदर्शनाचे उद्घाटन* *शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून काम करण्याची गरज - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 5/13/2022 7:18:26 PM

           रत्नागिरी दि. 13 : विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या  काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे. अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल असा आशावाद राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

            दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सुवर्ण पालवी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल महोदयांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

            या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री दादाजी भुसे तसेच भटके आणि विमुक्त व अर्ध भटक्या जाती जमाती कल्याण आणि विकास मंडळाचे अध्यक्ष दादा इदाते, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते. इतर प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, तसेच या प्रदर्शनाचे प्रायोजक पितांबरी समुहाचे रविंद्र प्रभूदेसाई आदी समावेश होता.    

            रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे. एका बाजूला डोंगररांगा दुसऱ्या बाजूला सागर किनारा असणाऱ्या या जिल्ह्याची हापूस आंब्यामुळे संपूर्ण जगभरात ओळख आहे. यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या. प्रथम श्वेतक्रांती नंतर हरित क्रांती आणि आता निलक्रांती धोरण स्वीकार

Share

Other News