स्वेच्छानिवृत्ती आणि अधिकारी भोंगळ कारभार

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 21/01/2022 11:01 PM


                 सरकारी नोकरी पाहिजे अशी सर्वांची इच्छा असते आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण रांत्र दिवस अभ्यास करून मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून जर नशीबाने सरकारी किंवा ठेकेदार पद्धतीवर नोकरी मिळालीच तर आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मिळेल त्या परिस्थितीवर मात करून चालविला जातो. शासन निर्णयानुसार सरकारी नोकरीत आपल्या जीवनाची कमीत कमी २५/३० वर्ष शासकीय आॅफिस झाडून काढणारे. खुर्चीत बसून आदेश देणारे यातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडे काम करणारे वाहक चालक मोटर परिवेक्षक शिपाई क्लार्क अशा विविध पदांवर काम करणार्या कर्मचारी यांना हिन वागणूक दिली जाते तरी सुद्धा नाइलाजाने हे सर्व जण खाली मान घालून काम करत असतात. यांतच नोकरिला असणार्या महिलांचे जीवन हे स्वार्थी नजराना सामोरे जाणारे असते त्यांना त्यांचे वरिष्ठ अगदी निच वागणूक देत आहेत असे निदर्शनास आले आहे  म्हणजे सर्व नोकरी आयुष्य हे सर्कस म्हणावे लागेल. आणि एक वेळ या शासकीय सरकारी नोकरीला राम राम करण्याची वेळ येते शासनाच्या पेन्शन अधिनियम कायदा यानुसार महिन्याला तुमच्या पगारातून पी एफ कापला जातो आणि त्यातून गोळा होणारी विशिष्ट रक्कम त्या रक्कमेत शासन निर्धारित रक्कम जमा करून वयाच्या ५९ वया वर्षी निवृत्ती घेणार या व्यक्तिला पेन्शन म्हणून दिली जाते. आणि त्यातच तो व्यक्ती आपल्या उतरत्या वयात आपला व आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असते यामध्ये सुध्दा बोगस कारभार होत आहे तो असा की निवृत्ती झाली एकाची आणि पेन्शन पी पी ओ नंबर बदलला जातो आणि स्वेच्छानिवृत्ती घेणारे काही कर्मचारी आहेत त्यांना ती पेन्शन मिळतच नाही. उच्च अधिकारी व कर्मचारी अशा लोकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन ज्या व्यक्तिने आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची वर्षे देऊन शासकीय आॅफिस अधिकारी व कर्मचारी यांची सेवा केली त्यांना आपल्या हक्काची पेन्शन मिळविण्यासाठी आपलेच चप्पल झिजवावे लागते सर्वात वाईट आहे बघा. 
                  श्री अब्दुल रहेमान इस्माइल पटेल हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे येथे वाहन प्रशिक्षक पदांवर. रा प नारायणगाव. आगार  काम करत होते. आपल्या वैयक्तिक कारणांमुळे त्यांची शारीरिक आरोग्य व्यवस्थित नसल्यामुळे व घरचा काहीतरी अडचणी मुळे 
विभागीय आस्थापना आदेश ३७ 
नुसार 
(१) मा महाव्यवस्थापक क व औ स क्रमांक २३/२००३ म्हणजे  २६/८/२००३ नुसार आदेश. परिपत्रक जारी करण्यात आला होता
(२)  मा महाव्यवस्थापक क व औ स यांचें परिपत्रक राप / कर्म वरगराजय / संवर्ग/ २२५३ दिनांक १०/५/२००६ 
(३) मा उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचें पत्र क्र जा क्र / आस्था/ सा प्र/ ३३ दिनांक  ४/१/२००७
(४) आगार व्यवस्थापक रा प नारायणगाव पत्र क्र जा क्र राप/ आवया / ना गाव / प्र शा / ५७७दिनांक १९/१०/२०२० रोजी पटेल यांनी. स्वेच्छानिवृत्ती साठी सदर नारायणगाव परिवहन महामंडळ यांचेकडे स्वेच्छानिवृत्ती श्री अब्दुल रहेमान इस्माइल पटेल तातपु कारागीर क वाहनपरिक्षक रा प नारायणगाव आगार यांनी तात्पु कारागीर क वाहनं प्रशिक्षक या पदावरून तीन महिन्यांची पूर्व सूचना देऊन दिनांक १७/ १०/२०२० रोजीचया अर्जानुसार दिनांक ३१/०१/२०२१ म पु पासून स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात यावी यासाठी पत्र व्यवहार केला होता त्यानुसार त्यांची सेवानिवृत्ती दिनांक ३१/०१/२०२१ पासून मंजूर करण्यात येत आहे असे नारायणगाव आगार यांनी पत्रानुसार कळविले आहे आणि त्यानुसार श्री पटेल यांचें नाव रा प नारायणगाव आगार येथील हजेरी पटावरून हटविण्यात आले आहे व पुणे विभागाच्या संखयाबळावरून दिनांक ३१/ ०१/ २०२१ म पु पासून कमी झाले सर्व काही व्यवस्थित चालले होते नंतर पटेल याना त्यांनी घेतलेल्या स्वेच्छानिवृत्ती ची पेन्शन मिळायला हवी होती पण ती मिळतच नव्हती म्हणून पटेल यांनी नारायणगाव आगार व्यवस्थापक व विभागीय नियंत्रक यांच्याकडे ३०/१०/२०२१ रोजी व १७/६/२०२१ रोजी विभागीय नियंत्रक यांचेकडे पत्र व्यवहार केला वेळोवेळी आपले आर्थिक नुकसान सहन करत वेळोवेळी परिवहन महामंडळ कार्यालयाला आपलेच हक्काचे निवृत्ती वेतन मिळण्यासाठी हेलपाटे मारावे लागले कोणत्याही विभागीय नियंत्रक व महाव्यवस्थापक. उप अधक्ष. आगार व्यवस्थापक. यांच्याकडे विनंती करत होते पण कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यानी या पटेलांना कोणताही थांगपत्ता लागू दिला नाही. उलट उडवाउडवीची उत्तरे दिली 
            आत्ता मला सांगा जर पटेल यांचा पी पी ओ नंबर जर दुसर्या व्यक्तिला गेला असेल. तर त्याचवेळी निवृत्त झालेल्या त्या संबंधित व्यक्तिचा पी पी ओ नंबर कुठ आहे ? म्हणजे पटेल व संबंधित व्यक्तिं यांचे पी पी ओ नंबर दोन झाले तर मग एका व्यक्तिची पेन्शन कुठ आहे ? म्हणजे विभागीय नियंत्रक म्हणण्यानुसार जर विचार केला की आम्ही माहिती बरोबर पाठविली आहे ही सर्व चूक पेन्शन विभागांची आहे म्हणजे विभागीय नियंत्रक यांच्या व पेन्शन विभागासी संबंधित असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी जी माहिती पेन्शन विभागाला दिली असेल त्याप्रमाणे पेन्शन विभागाने पेन्शन प्रकिया पूर्ण केली असणार म्हणजे विभागीय नियंत्रक नारायणगाव आगार यामध्ये काम करणारे व उच्च पदांवर असणार्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथान कारभार आहे हे निश्चित झाले आहे मग असा मोठा प्रश्न आपल्यापुढे आहे की संबंधित पटेल यांना द्यावी लागणारी एका वर्षाची पेन्शन या अधिकारी व कर्मचारी यांच्या पगारातून कापली गेली पाहिजे. आणि पटेल यांना आपल्या पेन्शन साठी परगावाहून येणे जाणे यासाठी झालेला एक वर्षाचा खर्च सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून वसुल करण्यात यावा.  पटेल यांना जो पर्यंत पेंशन प्रकरणं निकालात निघत नाही तोपर्यंत सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचा पगार. निवृत्ती सर्व काही रोखण्यात यावे. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना चाफ बसला पाहिजे. आणि एक वर्षाची पेन्शन यातीलच कोणत्या अधिकारी व कर्मचारी यांच्या खिशात एक वर्ष जात नसेल कशावरून विचार करा 
             अशा सर्व विषयाला कंटाळून अखेर पटेल यांनी  बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर. रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा. रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा. मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा. माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा यांचे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांच्याकडे आपल्यावर व आपल्या कुटुंबांवर एक वर्ष झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तक्रार केली आहे. त्यानुसार संबंधित विभागीय नियंत्रक यांच्याशी ( रमाकांत महादेव गायकवाड यांची भेट घेतली असता त्यांनी पाहिजे तसा आम्हाला प्रतिसाद दिला नाही उलट ज्यांचे प्रकरणं आहे त्याच व्यक्तिने आम्हाला भेटा असे बेजबाबदार आणि आपल्या पदाला न शोभणारे  वक्तव्य करण्यात आले म्हणजे यांना आपल्या पदाचा आणि आपल्या हातात असणार्या सत्तेचा मोठा गर्व झाला आहे असे दिसते
              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

Share

Other News

ताज्या बातम्या