ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

टायगर ग्रूप ने पकडला अर्टिगा कारसह 4 लाख 20 हजाराचा मजा तंबाखू..


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 1/21/2022 10:50:58 PM


आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात चामोर्शी रोडवर बाबुराव  शेडमाके चौकात एका अर्टिगा कारसह 4 लाख 20 हजाराचा मजा तंबाखू शिवसेनेच्या टायगर ग्रूप ने पकडला.पकडण्यात आलेली अर्टिगा कार, आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील सलीम नावाच्या व्यापाऱ्याची असून, कारचा चालक रोहित मुळे रा.वैरागड वय 26 वर्ष याला अटक करण्यात आलेली आहे.
वैरागड च्या या व्यापाऱ्याकडून दररोज नेहमी जवळपास पाच लाखाच्या घरात सुगंधित तंबाखू ची विक्री गडचिरोली शहरात राजरोसपणे होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे.
कॅन्सर ला कारणीभूत असणाऱ्या सुगंधित तंबाखू च्या विक्री मुळे, गडचिरोली शहरात लाखोंची उलाढाल होत असल्याने,पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सदर कारवाईची सविस्तर माहिती जाणून घेतली असता, अर्टीगा कार किंमत 6 लाख  आणि सुगंधित मजा तंबाखू किंमत  4 लाख 20 हजार असा दहा लाख वीस हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,पोलिस विभागातर्फे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आलेली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येणार असून पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.

Share

Other News