ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*जि.प.सदस्य संघदीप भगत यांचे हस्ते भजन साहीत्य वाटप*


  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 1/21/2022 8:16:36 PM


🔘 जि.प.सदस्य संघदीप भगत यांचे हस्ते भजन साहीत्य वाटप*

वणी :-राजुर- 
चिखलगांव मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत यांनी आपल्या मतदार संघात विविध भजन मंडळास आतापर्यंत २० ते २५ भजन साहीत्य व लाऊड स्पीकर संच वाटप केले असुन आता चिखलगाव व निंबाळा रोड या गावातील भजन मंडळांना भजन साहीत्य वाटप केले आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग 20% सेस योजने मधून राभविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय भजन मंडळास भजन साहित्य पुरवणे या योजने मधून. प्रियंदर्शनी महिला भजन मंडळ चिखलगाव व गुरुदेव सेवा भजन मंडळ, निंबाळा रोड या भजन मंडळास आज दि.२१ जानेवारी ला संघदीप सु भगत सदस्य जिल्हा परिषद यवतमाळ यांचा हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी भजन मंडळाचे सदस्य बेबीताई थेरे,संदिप माटे ,अनुराधा कोरवते, पूजा पेंदोर, ललिता सिडाम, मनोज ढेंगळे, योगेश बरडे,सुभाष लसंते, ईश्वर परचाके उपस्थिती होते.

Share

Other News