ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पत्रकार संकेतराज बन्नेंच्या हल्लेखोरावर कडक कारवाईची पत्रकारांची मागणी , लवकरच संशयिताना अटक केले जाण्याची पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी दिली हमी...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 1/19/2022 9:51:53 PM


        मिरज मालगाव रोडवर मुख्यमंत्री साप्ताहिकचे आवृत्ती प्रमुख संकेतराज बने यांच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. 6 ते 7 अनोळखी हल्लेखोरानी बनने यांच्या डोक्यावर आणि हातावर रोडने हल्ला केला. बनने हे गंभीर जखमी असून त्याच्यावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 
          पत्रकार संकेतराज बने यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे. हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याची मागणी मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघ आणि मिरज शहर पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदना द्वारे केली आहे. 
            दरम्यान हल्लेखोरावर गुन्हे दाखल केले आहेत, लवकरच संशयितांना अटक केली जाईल, अस आश्वासन पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी पत्रकारांना दिले आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार के के जाधव, जेष्ठ पत्रकार दिघंबर शिंदे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे, मिरज शहर वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गणेश आवळे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्र कांबळे, राहुल मोरे, ईश्वर हुलवान, सुकुमार पाटील, अर्जुन यादव, मोहन वाटवे, शरद सातपुते,तोहीद मुल्ला, कोसेन मुल्ला, शाबाज मुतवल्ली, आदिल मकानदार, दीपक ढवळे, अमरसिंग देशमुख, गौतम प्रज्ञासूर्य, नझिर झारी, महंमद अत्तार, बंडू चौगुले आणि युनूस बागवान हे उपास्थित होते.

Share

Other News