ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*नराधम*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 11/27/2021 8:51:36 PM

                पर स्त्री मातेसमान कोणीतरी आपल्यासाठी सांगून गेले आहे पण आपल काम कस आहे पालथ्या घड्यावर पाणी असा प्रकार आहे. आपण. बिबी फातिमा शेख.  सावित्रीबाई फुले.  अहिल्याबाई होळकर.  राजमाता जिजाऊ.  झाशीची राणी लक्ष्मीबाई.  मदर तेरेसा.   इंदिरा गांधी.  यांच्या लेकीची उपमा आपण प्रत्येक महिला दिनाच्या वेळी देत असतो. पण आज खरोखरच अशी परिस्थिती आहे का ? आज महिला सुरक्षित आहे का ? घरातच नव्हे तर बाहेर शिक्षण घेणा-या मुली. कामासाठी बाहेर येणार्या महिला. कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही.  मग आपला महिला दिन साजरा करणे हे फक्त दाखविण्यासाठी आहे 
                 महिलेचे कुटुंबातील स्थान काय असत ? एक महिला साक्षर झाली की सर्व कुटुंब साक्षर होते.  गत काळात महिलांना चुल आणि मुल एवढाच दर्जा होता कुटुंब प्रधान व्यवस्थेत आपल मत मांडणे शिक्षणाचा अधिकार नव्हता तो अधिकार मिळवून देणारी व त्यासाठी आपल्या अंगावर शेण घाण शिव्या झेलणारी महिलांचं होती. म्हणून आज पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून महिला बरोबरीने काम करत आहेत शिक्षण घेत आहेत. सुई पासून विमान. नौकानयन अशा क्षेत्रात आपल्या कर्तव्याचा झेंडा महिलांनी गाडला आहे. तरि सुध्दा स्त्रीचे कुटुंबातील स्थान अजून सुधारले नाही.  आई.  मुलगी.  बहिण.  सून. वैगरे आशी वेगवेगळ्या नात्यात सर्वांना बांधून ठेवणारी स्त्री मातेसमान असतें आणि सर्व जबाबदाऱ्या कर्तव्य वेगवेगळ्या भूमिकेतून तिला निभावून नयावया लागतात हे तर खरेच आहे. पण त्या भूमिका. कर्तव्य निभावताना महिलेवर विविध मर्यादा पडतात.  या अशा विविध भूमिकांचे उदात्तीकरण आपण मोठ्या मनाने साहित्यात कथा कवितांमध्ये करतो.  पण प्रत्यक्ष मात्र महिलेला फारसे अधिकार नसतात नावापुरतेच अधिकार आणि भरमसाठ कर्तव्याचे ओझे महिलांच्या वाट्याला येते. कोणत्याही भूमिकेत घरात महिलांचे स्थान दुय्यम असते. या दुय्यम सथानचे काही फायदे मिळतात असेही वाटणे शक्य आहे.  कुटुंबात महिलेला आधार.   महिला सुरक्षितता.  वैगरे मिळतात व्यवहारिक विवंचना पासून सुटका मिळते.  त्याचबरोबर विविध नातेसंबंध ती कुटुंबाच्या केंद्रस्थानी राहते.  वगैरे फायदे वरवर पाहता दिसने शक्य आहे जणू पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था ही महिलांच्या हिताची ठरते असे फसवे चित्र रंगविले जाते.  एक व्यक्ती म्हणून महिलेचे कुटुंबातील स्थान दुय्यम असते.  कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो.  विकासाची संधी त्यांना उपलब्ध होत नाही.  या बाबी आपणास स्पष्ट दिसतात. आपल्या पुरुषप्रधान कुटुंबात बरेचसे तोटे महिलांच्या वाट्याला येतात.  महिलांबाबत समाजांत काही चुकीच्या गैरसमजुती प्रचलित असलेल्या महिलांकडून असलेल्या गैरवाजवी अपेक्षा.  सासू.  सून.  भावजय.  यासारख्या संबधाविषयी होणारी टवाळीची चर्चा.  महिलांच्या कुवती बद्दल पूर्वग्रह या सर्व बाबी कुटुंब संस्थेत महिलांच्या वाट्याला येते ते फक्त दुःख आणि दुःखच येते. 
              महिलांना विविध अत्याचार मग ते घरात असतील घराच्या बाहेर असतील. आज महिला कोठेही सुरक्षित नाही. शिक्षण घेणारी आपली मुलगी सुरक्षित नाही.  बाजारात. शिकवनी शिकणारी मुलगी सुरक्षित नाही.  प्रवासात सुरक्षितता नाही.  एकतर्फी प्रेमातून कोण मुलीच्या अंगावर पेट्रोल. आतून जाळण्याचा प्रयत्न करतो. अॅसिड हल्ला करणे.  असा प्रश्न एका मुलीचा नाही तर आज गाव तालुका जिल्हा राज्य देश यामधील सर्व लेकीचा आहे. तो प्रश्न दिल्लीतील निर्भयाचा नाही. आहे तो असे आणखी किती बळी घेणार आणि किती बळी जाणार कोणाला माहित ? एक समाज म्हणून आणि व्यवस्था म्हणून अशा प्रकाराच्या गुन्ह्यांविरोधात दंड ठोकून आपण उभे राहण्याची गरज आहे. अशा प्रकरणांमध्ये न्यायनिवाडा अशा प्रकारें झाला पाहिजे जेणेकरून गुन्हे कमी होण्यास मदत होईल.  पण आपणं समाज व इतर सामाजिक संघटना सेवाभावी संस्था युनियन यांनी अशा गुन्ह्यांविरोधात आंदोलने केली पण शासनाने प्रशासनाने पळवाटा शोधल्या जातात हे. निर्भया प्रकरणानातून आपल्या सर्वांच्या समोर आले.  कदाचित म्हणूनच हैदराबाद एन्काऊंटर लोकांना अधिक आवडले दहा दहा. पंधरा पंधरा वर्षे अशा बलात्कारी. अत्याचारी.  नराधमांना. आरोपींना तुरूंगात संभाळयाचे. खाऊ पिऊ घालायचे आणि कायद्याच्या सर्व कसोट्यांवर त्यांचा गुन्हा सिद्ध होऊनही पुन्हा त्याच कायद्यान्वये त्यांची शिक्षा लांबवत न्यायची या अशा धुळफेक प्रकरणाला समाज गोरगरीब माणूस सर्वसामान्य जनता. कंटाळली आहे. 
              ‌हिंगणगाव घाटातील तरुणीने या हल्ल्यानंतर माझे सर्व आयुष्य उध्वस्त झाले असा करूण व्याकूळ आक्रोश केला होता. विकी नगराळेला फासावर लटवेपरयणत त्या आक्रोशाचे ध्वनी कायम राहिले. पण तोपर्यंत हिंगणघाट सारख्या घटनांची पुनरावृत्ती घडणार नाही याची हमी आज शासन प्रशासन पोलिस न्याययंत्रणा. समाज. कोणीही जबाबदारी घेवू शकत कां ? महिला लैंगिक शोषण. बलात्कार आणि हत्या अशा गंभीर गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येवरून असा प्रश्न निर्माण होतो की अशा घटना का घडतात ? एक समाज म्हणून आणि यंत्रणा म्हणून आपल्या देशाला या आघाडीवर सातत्याने अपयश का येते ? महिला आणि पुरुष समान नाहीत आणि त्यामुळेच पुरुषांप्रमाणे महिला सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकत नाही. असे आरोपीची म्हणने असते. अशा समाजातील पितृसत्ताक मानसिकतेत आहे. लैंगिक तपासणी मुलगी नको मुलगा पाहिजे. अशी मानसिकता आहे. 
     लैंगिक शोषण हा आजार नसून एक मानसिक विकार आहे असा विकार जडलेले पुरुष महिलेला आपल्यापेक्षा कमी लेखतात हे वास्तव समजून घेतल पाहिजे. पितृसत्ताक मानसिकतेत लहानाचे मोठे होतात आणि शिक्षणाच्या अनेक संधी प्राप्त करून घेतात ते सामान्यतः आपण महिलेपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि त्यामुळेच आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार आहे असा फसवा आत्मविश्वास त्यांच्यात रूजू लागतो आणि त्यांचे रुपांतर पुढे अपराधात होते आणि त्यांच्या हातून अनेक गुन्हे होतात
 महाराष्ट्रात गेल्या पाच ते सहा वर्षांत ४/५ हजार महिला आणि ७/८ हजार बालकांवर अत्याचार झालेले आहेत. सांगली खिद्रापूरे प्रकरणं येथे नवजात अर्भक सापडले होते एक नव्हे अनेक सापडली होती. एक दिवस विषय वृतमापत्रात दिसला तयाचे आज तागायत नाव सुध्दा नाही   शहरी भागात ग्रामीण भागात त्याचप्रमाणे मुंबई सारख्या उपनगरांत एक हजारापेक्षा अधिक महिला लैंगिक शोषणाला बळी पडल्या महिलांचे व बालकांचे शोषण लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ले आणि अन्य अत्याचाराच्या घटना झालेल्या पिडिताना आवश्यक ते साह्य आणि पुनर्वसन करण्यासाठी. मनोधैर्य. योजना २०१३ मध्ये सुरू करण्यात आली २०१८ नंतर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे पुनर्वसन जबाबदारी देण्यात आली. 
            निरक्षरता.  गरिबी.  बेकारी.  दारिद्र्य.  अशा अनेक समस्या या देशाला भेडसावत असतात ईथली समाज व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तितकेच मोठे परिश्रम घ्यावे लागते. दुर्दैवाने चित्रपट किंवा अलीकडच्या माहिती तंत्रज्ञान समाजवृती. सदृढ करण्यापेक्षा त्यातल्या विकृतीना देखील संरक्षण दिलेलयाचे एकंदरीत दिसून येते याचाही परिणाम हा अशा घटनांच्या सवरूपातून पहावयास मिळतो.  छपाक या चित्रपटांचे एकिकडे कौतुक होत असतानाच समाजात अशा घटना पडद्यावरून ठळकपणे मांडून आपण गुन्हेगारी मानसिकतेला बळ देत नाही आहोत ना असा प्रश्न ही विचारला जात आहे नव्वदीच्या दशकात एकतर्फी प्रेमावर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. डर सारख्या समाजांतील नवतरूणीचया मनात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. प्रेमासारखया उदात्त अभिव्यक्तीला काळीमा फासणयाचे कृत्य चित्रपट माध्यम. प्रसार माध्यमे यातून आरोपी व्यक्ती नाव कायम दाखविणे त्यांची जाहिरात करताय का पिडिताची निंदा
          बलात्कार करणारे.  अत्याचारी.  हिंसाचारी. यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यापेक्षा जनतेच्या ताब्यात द्या तीच करतील त्याचा न्यायनिवाडा
          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

Share

Other News