तुमसर नगरपरिषद अंतर्गत कोट्यावधींच्या कामांचा लोकार्पण तथा भूमिपूजन सोहळा संपन्न!

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 25/11/2021 4:50 PM



दिग्गज लोकप्रतिनिधींची उपस्थिती

नगराध्यक्ष पडोळे यांच्या कामांची चर्चा

रोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर :- नगर परिषद तुमसर अंतर्गत शेकडो विकास कामे सध्याच्या काळात पार पडली आहेत. तर काही कामे नियोजनात असून काहींचे भूमिपूजन तथा लोकार्पण प्रतिक्षित होते. त्यातूनच गुरुवारला नप अंतर्गत कोट्यावधींच्या कामांचा लोकार्पण तथा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. शहरातील तब्बल १०० कोटींच्या वर झालेल्या कामांचे त्या कार्यक्रमातून प्रदीप पडोळे यांनी अभिमानाने प्रदर्शन केले आहे. सदर सोहळा भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार सुनील मेंढे व विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू शाळेच्या प्रांगणात पार पडला आहे. शहरातील विकास कामांची गती पाहता मेंढे आणि फुके यांनी पडोळे यांचे अभिनंदनही केले. नागरिकांना अपेक्षित कामे करून त्यांचे समाधान प्राप्त करणारे आजच्या घडीला काहीशे साध्य होत नाही, मात्र ते आपल्या कृतीतून करून दाखविणे पडोळे यांना शक्य झाल्याचे फुके यांनी बोलून दाखविले आहे.

तुमसर शहरात अनेक विषय धरुन राजकारण केले जाते. मात्र विकास कामांचे मुद्दे धरुन समाजकारण करण्याची एक नवीन प्रथा पडोळे यांच्या कामातून दिसून येत आहे. तुमसरात गुरुवारला त्यातूनच अनेको कामांचे भूमिपूजनासह लोकार्पण सोहळे थाटात पार पडले आहे. त्यात नेहरू शेळच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम, डॉ.आंबेडकर स्मारक येथील पहिल्या माळ्याचे लोकार्पण, शास्त्री पुतळा ते एस एन मोर महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याचे, रामजी गणेशा शाळेचे नवीन इमारतीचे भूमिपूजन, राजीव गांधी पुतळा परिसरात सौंदर्यीकरण व रूमचे लोकार्पण, सार्वजनिक आखाडा परिसरात वाचनालयाचे लोकार्पण, दत्त मंदिर येथे समाज भवनाचे बांधकाम, प्रभाग क्र. ३,४ व ५ येथे विविध ठिकाणी नाली, कव्हर तसेच रस्त्यालगत पेव्हरचे अश्या एकूण ११ कामाचे, प्रभाग ६ येथे १७ कामे, ११ येथे १४ कामे अश्या एकूण १० कोटींच्या कामांचे गुरुवारला लोकार्पण तथा भूमिपूजन पार पडले.

भूमिपूजन तथा लोकार्पनाच्या ह्या सोहळ्या दरम्यान उपाध्यक्षा गीता कोंडेवार, नप सभापती सचिन बोपचे, अर्चना भुरे, मेहताबसिंह ठाकूर, शिला डोये, किरणदेवी जोशी, नगर सेवक श्याम धूर्वे, रजनीश लांजेवार, सुनील पारधी, पंकज बालपांडे, राजू गायधने, किशोर भवसागर, कैलाश पडोळे, प्रमोद घरडे, कांचन कोडवानी, डॉ.कोडवानी  ताराबाई गभणे, विद्या फुलेकर, छाया मलेवार, खुशलता गजभिये, कल्याणी भुरे, विक्रम लांजेवार, मुन्ना पुंडे, कुंदा वैद्य, लीलाबाई पारधी, सुनील लांजेवार, आशिष कुकडे, योगेश रांगवणी, डॉ. फुलेकर, बी एम गजभिये, मुरलीधर वासनिक, नवनाथ मेश्राम, लक्ष्मीकांत सलामे, राजेश चीचखेडे, हुकूम साखरवाडे, गौरव नवरखेले, स्वप्नील मनगटे, राकेश बोकडे, पंकज ठवकर, शिवम सिंह, अनिल जीभकाटे, दिलीप सर्वे, सूर्यकांत सेलोकर, आनंद भुरे, शहारे मॅडम, देशमुख मॅडम, रीना माटे, किशोर माटे, देशभ्रतार गुरुजी, अड.दीपक रावलानी, अड. कारेमोरे, अड. भोयर,  अड.प्रमोद इलमे, अड. सक्सेना, अड. गणेशे,  प्रशासकीय वर्तुळातील मुख्याधिकारी विनोद जाधव, सर्व प्रशासकीय अभियंता व कर्मचारी तसेच सन्मानित नागरिक व नपच्या सर्व शाळेचे शिक्षक तथा शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

👇

१०० कोटींच्या वर विकास कामे साध्य करणारे पडोळे- परिणय फुके

- ४७ कोटींची अंतिम टप्प्यात असलेली पाणी पुरवठा योजना असो की शहरात पूर्णत्वास आलेली ११ कोटींच्या नवीन रस्ते तथा नाल्यांचे बांधकाम असो, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी शहर विकासाला यातून प्रथम प्राधान्य दिल्याचे दिसून येते. त्यात शिक्षण क्षेत्रात तब्बल ६ कोटी रुपये नप च्या शाळा बांधकामात खर्चून विद्यार्थ्यांचे भविष्य सुनिश्चित करण्याचे काम केले आहे. त्यात शहर सौंदर्यीकरण, रस्त्यालगत पेव्हर, ३ हजाराच्यावर वृक्षलागवड, विविध समाजाचे ऐक्य जोपासणारे समाज भवन, वाचनालये, लहान मुलांकरिता विविध प्रभागात उभारलेली छोटी बालोद्याने, अंधारलेल्या मार्गावर नवीन विजेचे खांब उभारून पथ दिव्याचे नियोजन, शहरातील मुख्य चौकांमध्ये हायमास्क दिवे, आरओ प्लांट तसेच नपच्या हद्दीतील मोकळ्या जागेवर सुरक्षा भिंती उभारून केलेली ही कामे १०० कोटींच्या घरात असल्याचे दिसते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामे पार पाडणाऱ्या पडोळेंचे कौतुक परिणय फुके यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या