ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*२६ नोंव्हेबर रोजी दौंड मध्ये "संविधान गौरव दिन " साजरा करण्यात येणार :- दिपक सोनवणे*


  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 11/24/2021 7:27:12 PMसातारा/प्रतिनिधी


दौंड, दि. २४ :-  यंदाही
सालाबादप्रमाणे २६ नोंव्हेबर २०२१ रोजी सकाळी १० वा. "संविधान गौरव दिन " साजरा करण्यात येणार आहे. त्या प्रसंगी माजी आमदार श्री रमेश आप्पा थोरात, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार श्री.जयदेव (आण्णा) गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री.पांडुरंग आण्णा मेरगळ, बारामती लोकसभा मतदार संघ समन्वय श्री.प्रवीण शिंदे साहेब, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष श्री. जितेंद्र भैय्या बडेकर, तालुका अध्यक्ष श्री आप्पासाहेब पवार,  पुणे जिल्हा परिषद सदस्य श्री.विरधवल जगदाळे, पुणे जिल्हा समाज कल्याण सभापती सौ.सारिका पानसरे, राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ वैशालीताई नागवडे, दौंड पंचायत समिती सभापती सौ.हेमलताताई फडके, उपसभापती श्री.विकास कदम, दौंड नगर परिषद नगराध्यक्षा सौ.शितल ताई कटारिया, उपनगराध्यक्ष श्री.विलास (बापु) शितोळे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष श्री.सोहेलभैय्या खान, दौंड नगरपरिषद गटनेते व जेष्ठ नगरसेवक श्री.बादशाह भाई शेख माजी नगरसेवक श्री.उत्तम सोनवणे व दौंड नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक, शालेय विद्यार्थ्यां समवेत,धार्मिक,सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षीय  मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संविधान स्तंभ संर्वधन समिती च्या वतीने दौंड पोलिस स्टेशन समोर संत गाडगे महाराज चौक संविधान स्तंभा पुढे २६ नोव्हेंबर २०२१ सकाळी १० वा.साजरा करण्यात येणार आहे.तरी संविधान ग्रंथ प्रचार, प्रसार व जनजागृती या राष्ट्रीय महान  कार्यामध्ये  सहभागी व्हावे अशी नम्र विनंती संविधान स्तंभ संर्वधन समितीचे दौंड अध्यक्ष दिपक सोनवणे यांनी केली आहे.

Share

Other News