ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

वाडीचे आशिष मेश्राम यांच्यासह शेकडो युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश


  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 10/25/2021 6:44:28 PMप्रतिनिधी वाडी :-  नविन पिढीतील निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते वाडीतील धडाडीचे युवक नेतृत्व आशिष मेश्राम यांनी काल शेकडो कार्यकर्त्यासह हिंगणा विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस व माजी नगराध्यक्ष राजेश थोराणे यांच्या नेतृत्वात त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी बोलतांना अश्विन बैस म्हणाले कि काँग्रेसमध्ये तरुणांना मोठी संधी असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण कार्यकर्ते व जिल्ह्यातील जुने कार्यकर्ते ही काँग्रेस पक्षामध्ये सामील होणार आहे. संपूर्ण  काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या ओढा वाढला आहे.भारताची राज्यघटना टिकविण्यासाठी काँग्रेसचा विचार अत्यंत महत्त्वाचा असून तरुणांनी ही जबाबदारी खांद्यावर पेलत पक्षासाठी काम करावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष राजेश थोराणे यांनी केले.यावेळी सुमित शंभरकर,कार्तिक शंभरकर, रोहित नागदेवे, नेहाल पाटील, अमित वानखेडे, अंकुश चव्हाण, राहुल ठाकूर, राहुल सोनी, सुरज कापसे, साहिल कापसे, सुशील तिरपूडे, अमन शंभरकर, राकेश मेश्राम यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.नवप्रवेशीत सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले.

Share

Other News