पेंढरी येथे नविन तलाठी रुजू करण्यात यावे. त्यातच ई पिक पाहणी ची समस्या दुर करण्यात बाबत.!

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 24/10/2021 2:57 PM


   _धानोरा तालुक्यातील मौजा पेंढरी येथे पेंढरी साजा क्र. २२ येथे नविन तलाठी देणेबाबत मा. तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले._
    _मौजा पेंढरी साजा क्र. २२ चे तलाठी यांची बदली झाल्याने नविन तलाठी अजून पर्यंत रूजू झाले नाही.
    _सदर क्षेत्रात धान विक्री ऑनलाईन प्रक्रिया करण्याची वेळ ३१ ऑक्टोंबर २०२१ असल्याने बऱ्याच मोठया प्रमाणात ई पिक पाहणी बाकी आहे. त्या अनुषंगाने भविष्यात शेतकऱ्यांना मोठा नुकसान सोसावा लागू शकतो. करिता या बाबींचा गंभीरपणे दखल घेऊन पेंढरी भागात नविन तलाठी किंवा पर्यायी व्यवस्था करून ई पिक पाहणी करून देण्यात यावी. जेणे करून अती दुर्गम भागातील शेतकऱ्यांना अडचण जाणार नाही._
    करीता तहसिलदार धानोरा यांच्याकडे निवेदनात मागणी केली आहे.
  _यावेळी निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, जिल्हा परिषद सदस्य राजु जिवाणी, कामनगड चे सरपंच संजय गावडे, सामाजिक कार्यकर्ता परमेश्वर गावडे, प्रशांत पेदापल्लीवार जांभळी चे उपसरपंच पुरुषोत्तम बावणे, माजी सरपंच दुधमाळा उमेश किरको, प्रदीप उसेंडी जांभळी व भागातील शेतकरी उपस्थित होते._

Share

Other News

ताज्या बातम्या