बीड जिल्ह्यात आता फिरते सर्जीकल पथक - डॉ. साबळे

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 21/09/2021 8:56 PM

ग्रामीण भागातील रूग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतर मोठ्या रूग्णालयात जावुन उपचार घेणे अडचणीचे ठरतअसल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी फिरते सर्जीकल पथक निर्माण केले आहे. यामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी,एक अधिपरिचारक यांचा समावेश असुन सर्जन म्हणुन स्वत: डॉ.साबळे देखील सेवा
देणार आहेत.बीड जिल्हा रूग्णालयातंर्गत फिरते
सर्जीकल पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. तज्ञांच्या अंतंर्गत सर्व रूग्णालयांमधुन  सेवा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. साथ रोगानंतर उद्भवणाऱ्या विविध आजारांमुळे सर्वसामान्य नागरीकांना मोठ्या प्रमाणावर सामाजिक,आर्थिक अडचणीत तोंड द्यावे लागत आहे. विविध
ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी
जावुन उपचार घेणे अडचणी ठरत आहे. त्यामुळे तालुकास्तरावरील रूग्णालयातुन सदरील सेवा विशेष तज्ञाअभावी देणे शक्य होत नाही. ज्यामध्ये सिझर,वैद्यकीय गर्भपात, छोट्या शस्त्रक्रिया, मोठ्या शस्त्रक्रिया, अपेंडीक्स ,हर्णिया  व इतर सेवा सर्वसामान्य रूग्णांना आता तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा रूग्णालयामार्फत प्रत्येक
 विशेष तज्ञास आपल्या रूग्णालयात येवुन सेवा
देण्यासाठी कळविल्यानंतर हे पथक संबंधित रूग्णालयात दाखल होणार आहे. अत्यावश्यक
सेवेसाठी स्वत: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे हे सर्जन म्हणुन सेवा देण्यासाठी उपस्थित रहणार असल्याच डॉ. साबळे यांनी म्हटले पथकामध्ये ग्रामीण रूग्णालय पाटोद्याचे
वैद्यकीय अधिक्षक डॉ.सदाशिव राऊत, केज उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ.स्नेहल मेंगडे, नेकनुर रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ.संदीप पाटील आणि जिल्हा रूग्णालयातील अधिपरिचारक महेंद्र भिसे यांचा समावेश असल्याची माहिती
शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या